Photos: श्रेया घोषालच्या नवऱ्याला पाहिलंय का? १० वर्षांच्या डेटिंगनंतर केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 01:29 PM2021-10-14T13:29:17+5:302021-10-14T13:34:21+5:30

Shreya ghoshal: श्रेया आणि शिलादित्य एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यानंतर या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं आणि त्यांनी लग्न केलं.

आपल्या सुमधूर आवाजाने कानसेनांना तृप्त करणारी लोकप्रिय गायिका म्हणजे श्रेया घोषाल (shreya ghoshal).

गेल्या कित्येक वर्षांपासून श्रेया तिच्या आवाजाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. त्यामुळे आज तिचा मोठा चाहता वर्ग पाहायला मिळतो.

संगीत क्षेत्रात कार्यरत असलेली श्रेया सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय आहे. श्रेया अनेकदा इन्स्टाग्राम, फेसबुकवर फोटो, व्हिडीओ शेअर करुन तिच्या जीवनातील लहान-सहान अपडेट चाहत्यांना देत असते.

अलिकडेच श्रेया आई झाली असून तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली होती.

श्रेयाने तिच्या कुटुंबासोबतचेदेखील अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यामुळे श्रेयाच्या कुटुंबाविषयी आणि खासकरुन तिच्या नवऱ्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते चांगलेच उत्सुक आहेत.

श्रेयाने २०१५ मध्ये शिलादित्य मुखोपाध्याय यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे.

शिलादित्य मुखोपाध्याय हे इंजिनिअर असून श्रेयासोबत त्यांनी लव्ह मॅरेज केलं आहे.

श्रेया आणि शिलादित्य एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यानंतर या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं आणि त्यांनी लग्न केलं.

जवळपास १० वर्ष श्रेया आणि शिलादित्य एकमेकांना डेट करत होते.

शिलादित्य यांनी फिल्मी स्टाइलमध्ये श्रेयाला लग्नाची मागणी घातली होती. एका मुलाखतीत श्रियाने हा अनुभवही शेअर केला होता.

श्रेया आणि शिलादित्य यांचा एक खास फोटो