रणवीर सिंगच्या मते बॉलिवूडमधील ही अभिनेत्री आहे बेस्ट किसर, जाणून घ्या तिच्याबद्दल

Published: May 10, 2021 07:40 PM2021-05-10T19:40:51+5:302021-05-10T19:59:14+5:30

रणवीर सिंगने बॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्रींसोबत काम केले आहे. त्यात दीपिका पादुकोण, प्रियंका चोप्रा, वाणी कपूर, सारा अली खान, अनुष्का शर्मा या अभिनेत्रींचा समावेश आहे.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग ही जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडींपैकी एक जोडी आहे.

दीपिका आणि रणवीर एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करण्यासाठी मागेपुढे पाहत नाही आणि ते खुल्लमखुल्ला एकमेकांची प्रशंसा करत असतात.

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत रणवीर सिंगने दीपिका पादुकोणच्या किसिंग स्किल्सचे कौतुक केले होते. जेव्हा त्याला विचारण्यात आले होते की बॉलिवूडमध्ये बेस्ट किसर कोण आहे. त्यावर त्याने माझ्या मते दीपिका पादुकोण आहे असे म्हटले होते.

दुसऱ्या एका मुलाखतीत जेव्हा दीपिकाला हाच प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा ती म्हणाली होती की, रणवीर सिंग बेस्ट किसर आहे.

'गोलियों की रासलीला: रामलीला' सेटवर रणवीर आणि दीपिकाचे प्रेम फुलले होते आणि या चित्रपटात त्यांचे किसिंग सीन चित्रीत केले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार या किसिंग सीनच्या शूटिंगदरम्यान कट बोलल्यानंतरही रणवीर दीपिका एकमेकांना किस करत होते.त्यानंतर ते दोघे एकमेकांसोबत जास्त वेळ व्यतित करू लागले होते.

रणवीर आणि दीपिकाने सहा वर्षे एकमेकांना डेट केले.

त्यानंतर २०१८ साली ते दोघे इटलीमधील लेक कोमो येथे विवाह बंधनात अडकले होते.

रणवीर आणि दीपिकाने 'गोलियों की रासलीला: रामलीला'नंतर बाजीराव मस्तानी, पद्मावत यासारख्या सिनेमात एकत्र कामे केले आहे. तसेच ८३ सिनेमात ते दोघे काम करताना दिसणार आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Read in English