शाहरूख खानच्या करिअरचा पहिला इंटीमेट सीन ज्यामुळे उठलं होतं वादळ, आजही होते त्या सीनची चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 12:57 PM2020-11-25T12:57:50+5:302020-11-25T13:05:26+5:30

शाहरूख खानशी संबंधित एक जुना किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात शाहरूख खानने बोल्ड सीन दिला होता.

शाहरूख खान अनेक वर्षांनी सिनेमाच्या शूटींगवर परतला आहे. तो २ वर्षांनी सिनेमाच्या सेटवर दिसला. सध्या तो दीपिका पादुकोनसोबत आगामी 'पठाण' सिनेमाचं शूटींग करतोय. दीपिकाची या सिनेमात मुख्य भूमिका आहे. या शाहरूखची भूमिका एका मिशनवर आहे आणि त्यात दीपिकाची भूमिका साथ देणार आहे. अशात शाहरूख खानशी संबंधित एक जुना किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात शाहरूख खानने बोल्ड सीन दिला होता.

शाहरूख खान आपल्या करिअरच्या सुरूवातीच्या दिवसात फारच संघर्ष केला. हिट सिनेमांसोबतच त्याने सुरूवातीला असे काही सिनेमे केले जे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झालेत. इतकेच नाही तर त्याने एका सिनेमात बोल्ड सीनही केला होता. ज्यामुळे चांगलंच वादळ उठलं होतं.

'दिवाना' सिनेमानंतर त्याने अनेक फ्लॉप सिनेमे दिले. ज्यातील एक होता 'माया मेमसाब'. या सिनेमात त्याने अनेक बोल्ड सीन केले होते. या सीन्समुळे तो फारच चर्चेत आला होता. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री दीपा साही मुख्य भूमिकेत होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिनेमात बोल्ड सीन देण्यासाठी दीपाने फार बोल्ड पावले उचलली होती. या सीनची अशी चर्चा झाली होती की, एका मॅगझिनच्या रिपोर्टरने शाहरूखबाबत काहीतरी भलतंच छापलं होतं. यामुळे संतापलेला शाहरूख रिपोर्टरला मारायलाही गेला होता अशी चर्चा आहे.

या सिनेमातील बोल्ड सीनमुळे शाहरूखसाठी सगळं काही बदललं होतं. त्याची सगळीकडे चर्चा होऊ लागली होती. अनेक वाद निर्माण झाले होते. या सिनेमाचं दिग्दर्शन केतन मेहता यांनी केलं होतं.

केतन मेहता यांचा 'माया मेमसाब'९० च्या काळातील सर्वात बोल्ड सिनेमांपैकी एक होता. महत्वाची बाब म्हणजे केतन मेहता यांना माया मेमसाबसाठी ज्यूरी नॅशनल अवॉर्डही मिळाला होता.

या सिनेमाची कथा एका अशा महिलेची होती जी तिच्या लग्नाला कंटाळली आहे. आणि तिचे अनेक लोकांसोबत अफेअर आहेत. नंतर तिचा मृत्यू रहस्यमयपणे होतो. दीपा साहीने यातील भूमिका फारच दमदार केली होती. पण तरी हा सिनेमा फार चालला नाही.

शाहरूख खानने या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच बोल्ड सीन केला होता. ज्यामुळे अर्थातच चर्चा होणार होती. या सिनेमानंतर लोकांना वाटलं होतं की, शाहरूख आता इंडस्ट्रीतून बाहेर होईल. पण तसं झालं नाही.