अभी तो मै जवान हुँ ! ६४ वर्षाचे झाले अनिल कपूर, पाहा त्यांचे झक्कास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 01:39 PM2020-12-24T13:39:44+5:302020-12-24T13:46:09+5:30

आपल्या झक्कास अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेले अभिनेता म्हणजे अनिल कपूर. आजवर विविध चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत अनिल कपूर यांनी रसिकांची मनं जिंकली आहेत.अनिल कपूर आज आपला ६७ वा वाढदिवस साजरा करत आहे.

आजही अनिल कपूर चित्रपटसृष्टीत त्याच उत्साहाने आणि त्याच ताकदीने काम करत आहेत.

अनिल कपूर यांचा उत्साह आजच्या तरुण कलाकारांना लाजवेल असाच आहे. आजही अनिल कपूर चिरतरुण असल्याप्रमाणे भासतात.

वयाची ६४ ओलांडल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावर तारुण्याची झळाळी दिसून येते.

सध्या सोशल मीडियावर अनिल कपूर कधी वर्कआऊट करतानाचे फोटो तर कधी शर्टलेस होत निवांत समुद्राकाठी फिरताना ते पाहायला मिळतात.

९० च्या दशकात रसिकांना वेड लावणारे अनिल कपूर आजही तितकेच हँडमस दिसतात.

त्यांच्या चेहऱ्यावर वृद्धत्वाचा लवलेशही दिसत नाही.

अनिल कपूर यांचे फोटो पाहून भलेभलेही त्यांच्यापुढे फिके पडतात असाच त्यांचा अंदाज असतो.

अनिल कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

अनिल कपूरच्या वाढदिवशीनिमित्त एके वर्सेज एके सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

हा कॉमिक थ्रिलर सिनेमा नेटफ्लिक्सवर रसिकांच्या भेटीला येणार आहे.