‘केदारनाथ’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये सारा अली खानने केले सगळ्यांनाचं ‘बोल्ड’!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 10:25 AM2018-11-13T10:25:35+5:302018-11-13T10:30:23+5:30

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लेक सारा अली खान हिचा डेब्यू सिनेमा ‘केदारनाथ’चा ट्रेलर रिलीज झाला.या इव्हेंटमध्ये साराचे बोल्ड लूक पाहून सगळेच हैरान झालेत. चित्रपटात येण्यापूर्वी सारा अली खान चांगलीच गोलमटोल होती. पण डेब्यूपूर्वी तिने आपले अनेक किलो वजन घटवत, सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. सध्या तिचा हा ‘सिन्ड्रेला’ लूक सगळीकडे व्हायरल होत आहे.

‘केदारनाथ’ हा सारा अली खानचा डेब्यू सिनेमा आहे. या सिनेमाद्वारे ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय.

केवळ लूकचं नाही तर‘केदारनाथ’च्या ट्रेलरमधील साराचा अभिनयही शानदार आहे.

‘केदारनाथ’ या पहिल्याच चित्रपटात साराने एक किसींग सीनही दिला आहे.

या चित्रपटात सारा अली खान अभिनेता सुशांत सिंगसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे.

‘केदारनाथ’च्या ट्रेलरमधील अनेक दृश्ये चित्तथरारक आहेत. काही दृश्ये तर थेट ‘टायटॅनिक ट्रॅजिडी’ची आठवण करून देतात.

साराचा पहिला सिनेमा प्रेक्षकांना किती पसंत पडतो, साराचा डेब्यू किती यशस्वी होतो, ते बघूच