२९ वर्षांनंतर 'Roja'फेम अभिनेत्रीमध्ये झालाय कमालीचा बदल; आता दिसते पूर्वीपेक्षा फारच बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 04:49 PM2021-10-17T16:49:08+5:302021-10-17T16:54:49+5:30

Madhoo: वयाची ५० पार केलेली मधू सोशल मीडियावर सक्रीय असून आजही तितकीच ग्लॅमरस दिसते.

२९ वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला रोजा (Roja) चित्रपट अनेकांच्या लक्षात असेल. या चित्रपटाची निर्मिती मणिरत्नम यांनी केली होती.

काश्मीरमधील दहशतवाद्यांवर आधारित या चित्रपटात अभिनेता अरविंद स्वामी (Arvind Swamy) आणि मधू (Madhu) ही जोडी मुख्य भूमिकेत झळकली होती.

त्याकाळी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. केवळ चित्रपटच नाही तर अरविंद आणि मधू यांची जोडीही प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.

आजही हा चित्रपट अनेकजण आवडीने पाहतात.विशेष म्हणजे या चित्रपटातील मधूची लोकप्रियता आज इतक्या वर्षांनंतरही यत्किंचितपणे जराही कमी झालेली नाही.

पडद्यावर सोज्वळ पत्नीची भूमिका साकारणारी मधू खऱ्या आयुष्यात प्रचंड बोल्ड आणि बिंधास्त आहे.

वयाची ५० पार केलेली मधू सोशल मीडियावर सक्रीय असून आजही तितकीच ग्लॅमरस दिसते.

मधू अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

मधूने आनंद शाहसोबत लग्न केलं असून अजूनही त्या कलाविश्वात सक्रीय आहे.

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या थलायवी या चित्रपटात मधू झळकली होती. या चित्रपटात तिने व्हीएन जानकी रामाचंद्र यांची भूमिका साकारली होती.

हा फोटो पाहिल्यानंतर वय हा केवळ आकडा आहे याची जाणीव होते.