लग्न लांबलं, लिव्ह-इन ठरलं...! अली-रिचाच्या नव्या आयुष्याला सुरुवात

By रूपाली मुधोळकर | Published: November 24, 2020 01:24 PM2020-11-24T13:24:53+5:302020-11-24T13:35:50+5:30

यंदा रिचा आणि अली विवाहबंधनात अडकणार होते. पण...

रिचा चड्ढा आणि अली फजल बॉलिवूडचे एक बिनधास्त कपल. हे कपल लग्नबंधनात अडकणार, अशी गेल्या दिवसांपासून होतेय. पण आता लग्नाचा बेत मागे पडलाय आणि कपल लिव्ह इनमध्ये राहू लागलेय.

काही महिन्यांआधी अली व रिचा लग्न करणार होते. बेत ठरला होता. पण कोरोना महामारीने सगळेच वेळापत्रक कोलमडले. अली व रिचाच्या लग्नाचा बेतही लांबणीवर पडला.

लग्न लांबल्याने या जोडप्याने अखेर लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला.

नुकतीच रिचा अलीच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली. अलीच्या समुद्र किनारी असलेल्या अपार्टमेंटमध्ये सध्या हे कपल राहतेय.

अली फजलने नुकताच जुहूमध्ये एक बंगला भाड्याने घेतला आहे. या बंगल्याचे महिन्याचे भाडे लाखांमध्ये आहे. पहिल्या वषार्साठी ३ लाख रुपये, दुसºया वर्षी बंगल्याचे भाडे ३.१५ लाख रुपये तर तिसºया वर्षी ३.३० लाख रुपये त्याला दर महिन्याला द्यावे लागणार आहे.

अली फजल गेल्या अनेक वर्षांपासून रिचा चड्ढासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. लवकरच दोघे लग्न करणार आहेत.

अलीने रिचाला कसे प्रपोज केले होते? तर बिना अंगठीचे. होय, खुद्द अलीने याबद्दल एका मुलाखतीत सांगितले होते. ‘मी रिचाला प्रपोज केले. पण यासाठी मी कहीही प्लान केला नव्हता. मी तिला प्रपोज करायला गेलो तेव्हा माझ्याजवळ अंगठीही नव्हती. फक्त हीच योग्य वेळ आणि ठिकाण आहे, एवढेच मला माहित होते,’ असे अलीने सांगितले होते.

रिपोर्टनुसार, रॉबर्ट डाऊनी (ज्युनिअर)चा ‘चॅप्लिन’ हा सिनेमा पाहत असताना रिचाने अलीला प्रपोज केले होते. त्यावेळी अलीने काहीही उत्तर दिले नव्हते. यानंतर तीन महिन्यांनी अलीने रिचाला प्रपोज केले होते.

अली व रिचा बॉलिवूडचे बिनधास्त कपल म्हणून ओळखले जाते. दोघेही बिनधास्त एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.