रिया चक्रवर्तीने शेअर केलं तिच्या डायरीचं पान, ज्यात सुशांतच्या हस्ताक्षरात लिहिलंय खूप काही!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 02:33 PM2020-08-08T14:33:39+5:302020-08-08T14:53:13+5:30

वेगवेगळ्या आरोपांनंतर रिया चक्रवर्तीने शुक्रवारी ईडी ऑफिसमध्ये जाऊन आपला जबाब नोंदवला. आता रियाने तिच्या डायरीचं एक पान शेअर केलं आहे.

सुशांत सिंह राजपूत्या मृत्यूनंतर त्याच्या सुसाइड केसची चौकशी होत आहे. या केसबाबत दररोज नवीन गोष्टी समोर येत आहेत. अशात वेगवेगळ्या कारणांनी सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती ही संशायाच्या जाळ्यात अडकली आहे.

वेगवेगळ्या आरोपांनंतर रिया चक्रवर्तीने शुक्रवारी ईडी ऑफिसमध्ये जाऊन आपला जबाब नोंदवला. आता रियाने तिच्या डायरीचं एक पान शेअर केलं आहे. रियाने दावा केलाय की, तिच्या डायरीमध्ये सुशांतद्वारे काही गोष्टी लिहिण्यात आल्या आहेत.

रियाने दावा केला आहे की, सुशांतची निशाणी आणि प्रॉपर्टीच्या रूपात तिच्याकडे केवळ ही डायरी आहे. ज्यावर सुशांतने तिच्याबाबत आणि तिच्या परिवाराबाबत लिहिलं होतं. रियाने दावा केलाय की, या डायरीतील अक्षर हे सुशांतचं आहे.

या डायरीचा फोटो पाहिला तर लक्षात येतं की, लिहिणाऱ्याने लिहिलं की, तो त्याच्या जीवनासाठी आभारी आहे. सोबतच लिल्लू, बेबू, सर, मॅम आणि फज जीवनात असल्याने तो आभारी आहे.

रियाने इंडिया टुडेला सांगितलं की, 'ही हॅंडरायटिंग सुशांतची आहे. लिल्लू शोविक आहे, बेबू मी आहे, सर माझे वडील आणि मॅम माझी आई आहे. सोबतच फज सुशांतच्या डॉगीचं नाव आहे'. रियाने तिच्या वकिलाच्या माध्यमातून तिच्या डायरीचं पान शेअर केलंय.

सोबतच रियाने असंही म्हणाली की, या डायरीशिवाय तिच्याकडे सुशांतची निशाणी म्हणून त्याचं एक सिपर आहे.

दरम्यान शुक्रवारी रिया चक्रवर्तीसहीत तिच्या परिवाराला विचारपूस करण्यात आली. यात सुशांतच्या अकाऊंटमधून १५ कोटी रूपये काढणे, तसेच रिया आणि तिच्या भावाच्या स्टार्टअप कंपन्यांबाबत काही प्रश्न विचारण्यात आले.

ईडीने रिया चक्रवर्तीला सुशांत केसबाबत आठ तासांपेक्षा अधिक विचारपूस केली. रियाकडून तिच्या संपत्तीबाबत, उत्पन्नाबाबत विचारपूस करण्यात आली. रिया चक्रवर्तीने ईडीला ऑडीट रिपोर्टही दिला आहे.

ईडी ऑफिसमध्ये रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती यालाही २ तास विचारपूस करण्यात आली. शोविक आणि सुशांत चांगले मित्र होते. असेही सांगितले जाते की, दोघे नेहमीच वेळ घालवत होते.

सध्या सुशांत केसची आता सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. असे मानले जात आहे की, सीबीआय लवकरच रिया चक्रवर्तीची विचारपूस करतील. अशात रियाने शेअर केलेल्या या डायरीच्या पानामुळे केसला नवं वळण मिळू शकतं.