Preity Zinta पासून Ranbir Kapoor पर्यंत; स्पोर्ट्स टीमचे मालक आहेत हे Actors

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 09:14 AM2021-10-23T09:14:25+5:302021-10-23T09:21:00+5:30

Bollywood च्या अनेक कलाकारांना केवळ अभिनय क्षेत्रातच नाही, तर स्पोर्ट्समध्येही मोठ्या प्रमाणात रस आहे.

बॉलिवूड स्टार्सना (Bollywood Stars) केवळ अभिनयातच नाही, तर खेळातही रस आहे. चित्रपटाच्या प्रमोशन व्यतिरिक्त अनेकदा कलाकार स्पोर्ट्स टीमलाही प्रोत्साहन देताना दिसत असतात. बॉलिवूडचे अनेक कलाकार स्पोर्ट्स टीमचे मालकही आहेत. दिपिका पदुकोण, रणवीर सिंह हे आता IPL च्या दोन नव्या संघांसाठी बोली लावताना दिसतील. शाहरूख हा क्रिकेट संघाशी जोडला गेलेला आहे, तर दुसरीकडे जॉन अब्राहम हा फुटबॉल संघाशी जोडलेला आहे.

Hritik Roshan ची फुटबॉल टीम, पुणे सिटी एफसी ही आहे. २०१४ मध्ये तो चॅरिटीसाठी फुटबॉल खेळला होता. त्याच्या टीमची आजपर्यंत कामगिरी उल्लेखनीय राहिलेली नाही. त्यामुळे ही टीम फारशी चर्चेतही नसते.

मुंबई प्रीमिअर फुटबॉल लीगमद्ये नुकतंच रणबीर कपूरनं गुंतवणूक केली आहे. या टीमचं नाव मुंबई सिटी एफसी आहे. एका मुलाखतीत त्यानं आशियातील बेस्ट फुटबॉल टीम तयार करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

जॉन अब्राहम आयएसएलच्या एका टीमचा मालक आहे. नॉर्थइस्ट युनायटेड एफसी नावाची त्याची टीम आहे. यासोबत त्याचे गुवाहाटी, आसाममध्येही फुटबॉल क्लब आहेत.

शाहरूख खानची आयपीएलटी टीम आहे, कोलकाता नाईट रायडर्समध्ये जुही चावला, जय मेहता आणि रेड चिलिज एन्टरटेन्मेंटचे मालक आहे. शाहरूख हा साऊथ आफ्रिकामध्ये केप टाऊन नाईट रायडर्स आणि ट्रिनबागो नाईट रायडर्सचा मालक आहे. त्यानं २०१५ आणि २०१७ मध्ये दोन्ही संघात गुंतवणूक केली होती.

अभिषेक बच्चन याची कबड्डी टीम आहे. तो दोन टीमचा मालक आहे. यामध्ये प्रो कबड्डी लीग (PKL) आणि इंडियन सुपर लीग (ISL) सारख्या टीमचा समावेश आहे. पीकेएलची जयपूर पिंक पँथर्स टीम आहे आणि आयएसएलची चेन्नइयीन एफसी अशी टीम आहे. पीकेएलच्या पहिल्या सीझनमध्ये जयपूर पिंक पँथर्स विजेता टीम होती, याशिवाय आयएसएलच्या टीमनं आपल्या नावे दोन अवॉर्ड केले आहेत.

प्रिती झिंटा ही आयपीएलच्या पंजाब किंग्स या संघाची मालक आहे. २००८ मध्ये तिनं हा संघ घेतला होता. ही टीम प्रिती झिंटा, नेस वाडिया, मोहित बर्मन आणि करण पॉल यांची जॉईंट टीम आहे.

कोलकाता बेस्ड प्रो कबड्डी लीगमध्ये बंगाल वॉरिअर्स या नावाची अक्षय कुमारची टीम आहे. त्यानं भागीदारीत ही टीम सुरू केली होती. यापूर्वी त्यानं खालसा वॉरिअर्स टीममध्येही गुंतवणूक केली होती.

सलमान खानचा भाऊ सोहेल खानदेखील स्पोर्ट्स टीमचाभाग आहे. त्यानं सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये मुंबई हिरोज या टीममध्ये गुंतवणूक केली आहे. त्याला अनेकदा क्रिकेट ग्राऊंडमध्ये स्पॉट केलं जातं.