वयाच्या 42 व्या वर्षी अभिनेत्री पूजा बत्राने गुपचूप केले होते दुसरे लग्न, लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला नवऱ्याला दिल्या अशा शुभेच्छा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 04:56 PM2020-07-04T16:56:16+5:302020-07-04T16:56:16+5:30

बॉलिवूड अभिनेत्री पूजा बत्राने मागील वर्षी अभिनेता नवाब शाहसोबत लग्न केले होते.

आज 4 जुलै रोजी त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले.

या खास दिवशी पूजाने नवऱ्यासोबतचा फोटो शेअर करत फर्स्ट अॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त पूजाने फोटो शेअर करत लिहिले की, पूर्ण जीवनाचा वेळ एका क्षणाचा होऊ शकतो.

पूजाच्या या पोस्टवर तिचे चाहते आणि कलाकार शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

पूजा बत्राचे हे दुसरे लग्न आहे.

यापूर्वी तिने 2002 साली लॉस अँजेलिसमध्ये ऑर्थोपेडिक सर्जन सोनू आहलूवालियासोबत लग्न केले होते. जवळपास लग्नाच्या 9 वर्षांनंतर ते 2011 साली विभक्त झाले होते.