मुंबईतील या परिसरात पाहाण्यात आले दिशा पटानीला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 07:00 PM2019-04-26T19:00:11+5:302019-04-26T19:07:41+5:30

दिशा पटानीला नुकतेच मुंबईतील मढ आयलँड येथे पाहाण्यात आली. यावेळी ती कॅज्युअल लूकमध्ये खूपच छान दिसत होती.

व्हाईट टी-शर्ट, पँट आणि काळ्या रंगाच्या कॅपमधील दिशाला पाहाण्यासाठी चाहत्यांनी चांगलीच गर्दी केली होती.

दिशा लवकरच सलमान खानसोबत भारत या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाच्या ट्रेलरची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

भारत या चित्रपटात दिशा, सलमान यांच्यासोबतच कतरिना कैफ, सुनील ग्रोव्हर, जॅकी श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका आहेत.

दिशा पटानी पहिल्यांदाच सलमान खानसोबत काम करणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यापासून त्यांच्या दोघांच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

भारत या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जाफर करत असून हा चित्रपट 5 जूनला प्रदर्शित होत आहे.

दिशा भारत नंतर मलंग मध्ये दिसणार असून या चित्रपटात अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर आणि कुणाल खेमू यांच्या मुख्य भूमिका आहेत.