पडद्यावर परफेक्ट दिसणा-या ‘या’ स्टार्सच्या विचित्र सवयी वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 01:42 PM2020-08-04T13:42:49+5:302020-08-04T13:49:47+5:30

सलमान गोळा करतो साबण, तर आमिरला आंघोळीचा कंटाळा...

सलमान खान- सलमानच्या या सवयीला विचित्र म्हणतात येणार नाही. त्याला साबण जमा करण्याचा छंद आहे. जगातील हँडमेड सोप, हर्बल सोप, डिझाईनर सोप असे मोठे कलेक्शन त्याच्याकडे आहे.

आमिर खान - आमिर खानला बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की, आमिरला आंघोळ करणे अजिबात आवडत नाही. त्याला आंघोळीचा जाम कंटाळा आहे.

शाहरूख खान - शाहरूख खान लक्झरी लाईफ जगतो. त्याची विचित्र सवय काय तर तो घरात कधीच शूज काढत नाही. अनेकदा तर तो शूज घालूनच झोपी जातो.

करिना कपूर - बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री करिना कपूरला नखे कुरतडण्याची सवय आहे. टेन्शन असेल वा कुठल्याशा विचारात असेल तर ती नखं कुरतडू लागते.

सुश्मिता सेन -सुश्मिता म्हणजे बोल्ड, बिनधास्त अभिनेत्री. साहजिकच तिच्या आवडीही तितक्यात बोल्ड असणार. होय, सुश्मिताला म्हणे उघड्यावर आंघोळ करायला जाम आवडते. तिच्या टेरेसवर बाथटब असल्याच्या चर्चाही मध्यंतरी रंगल्या होत्या.

सैफ अली खान - बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान याचा अधिकाधिक वेळ बाथरूममध्येच जातो. होय, बाथरूममध्ये वेळ घालवणे त्याला मनापासून आवडते. त्याच्या बाथरूममध्ये एक मिनी लायब्ररीही आहे.

जॉन अब्राहम - जॉनला पाय हलवण्याची सवय आहे. कुठेही बसला असो, उभा असो तो सारखा पाय हलवत असतो.

आयुष्यमान खुराणा - आयुष्यमान कुठेही जावो, एक गोष्ट त्याच्याजवळ असतेच असते ती म्हणजे डेंटल किट. होय, दात स्वच्छ ठेवण्यासाठी वारंवार ब्रश करण्याची त्याची सवय आहे. डेंटल किट सोबत नसेल तर तो अस्वस्थ होतो.

प्रिती झिंटा - प्रितीला बाथरूम स्वच्छच हवे. बाथरूम स्वच्छ केल्याशिवाय ती ते वापरत नाही. हॉटेल बुक करतानाही आधी ते तिथले बाथरूम बघते.

विद्या बालन - विद्या बालन मोबाईलबद्दल कमालीची हलगर्जी आहे. इतकी की, अनेक दिवस ती मोबाईल चेक करायचे विसरते. यामुळे अनेक इव्हेंट तिने मिस केले आहेत.

सनी लिओनी - सनी लिओनीला एक विचित्र सवय आहे. ती म्हणजे वारंवार पाय धुणे. घरी असो वा सेटवर 15-15 मिनिटांनी ती पाय पाण्याने धुते.

जितेन्द्र - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जितेन्द्र यांची एक विचित्र सवय आहे. होय, चर्चा खरी मानाल तर जितेन्द्र यांना कमोडवर बसून फळ खाणे आवडते.

Read in English