#Nehudavyah : हळदी सेरेमनीत नेहा कक्कर आणि रोहनप्रीत दिसले रोमँटिक अंदाजात, See Photos

By तेजल गावडे | Published: October 24, 2020 10:06 AM2020-10-24T10:06:31+5:302020-10-24T10:12:41+5:30

Neha Kakkar is Going to Marry Rohanpreet Singh: गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. येत्या २६ ऑक्टोबरला दोघेही सप्तपदी घेणार आहेत.

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. येत्या २६ ऑक्टोबरला दोघेही सप्तपदी घेणार आहेत.

नुकताच त्यांचा हळदी समारंभ पार पडला. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा हळदी समारंभ झाला. नुकतेच नेहा कक्करने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या सोहळ्यातील कॅमेऱ्यात टिपलेले सुंदर क्षण शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये या दोघांची केमिस्ट्री खूप छान वाटते आहे.

नेहा कक्करने हळदी सेरेमनीमध्ये पिवळ्या रंगाची साडी नेसली होती आणि त्यावर फुलांची ज्वेलरी घातली आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहेत. तर रोहनप्रीतने हळदीच्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.

नेहा कक्करने इन्स्टाग्राम #Nehudavyah वापरत आपला हळदी सेरेमनीचे फोटो शेअर केले आहेत. नेहाच्या लग्नपत्रिकेनुसार २६ ऑक्टोबरला या दोघांचा विवाह होणार आहे असे सांगण्यात येत आहे.

अलीकडेच तिचा रोका सेरेमनी सुद्धा झाला होता. नेहा आपल्या कुटूंबियांसह सध्या दिल्लीत आहे. दिल्लीतच तिचा आणि रोहनप्रीत सिंगचा शाही विवाह सोहळा होणार आहे.

आपल्या आवाजाने तरूणाईला वेड लावणारी बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर पर्सनल लाईफमुळे अधिक चर्चेत असते. कधीकाळी नेहा आणि अभिनेता हिमांश कोहली कधी काळी एकमेकांच्या प्रेमात होते. पण अचानक दोघांचे ब्रेकअप झाले.

अनेक प्रयत्नानंतर नेहा ब्रेकअपच्या या दु:खातून बाहेर आली. यानंतर ‘इंडियन आयडल 11’च्या सेटवर असा काही ड्रामा रंगला की नेहा उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणसोबत लग्न करणार, अशा चर्चा रंगल्या.

रोहनप्रीत सिंगचे नाव तुम्ही याआधीही ऐकले असेलच. ‘इंडियाज् राईझिंग स्टार 2’ या म्युझिक रिअ‍ॅलिटी शोमध्ये तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता आणि या शोचा तो फर्स्ट रनरअप होता.

याशिवाय ‘मुझसे शादी करोगे’ या वेडिंग रिअ‍ॅलिटी शोमध्येही तो सहभागी झाला होता. नेहा व रोहनप्रीत खूप जुने मित्र आहेत.

अलीकडे दोघेही एका म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र दिसले होते.

Read in English