NCB च्या प्रश्नांचा दीपिका एकटीच करेल सामना, रणवीर सोबत जाण्याची होती चर्चा; पण....

By अमित इंगोले | Published: September 25, 2020 01:32 PM2020-09-25T13:32:34+5:302020-09-25T13:52:40+5:30

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, समन्स केवळ दीपिका पादुकोणला पाठवण्यात आला आहे. एनसीबी केवळ तिची चौकशी करेल.

ड्रग्स केसमध्ये नाव आल्यानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोण पती रणवीर सिंहसोबत गुरूवारी रात्री मुंबईत परतली. तिच्याकडून ड्रग्स केसबाबत काही प्रतिक्रिया आलेली नाही.

अशात चर्चा होती की, रणवीर सिंहने एनसीबीकडे विनंती केली होती की, त्यालाही चौकशी दरम्यान दीपिकासोबत राहण्याची परवानगी द्यावी. पण आता यावर एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांच्याकडे अशाप्रकारची कोणतीही रिक्वेस्ट आलेली नाही.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, समन्स केवळ दीपिका पादुकोणला पाठवण्यात आला आहे. एनसीबी केवळ तिची चौकशी करेल.

तसेच रणवीर सिंहकडून कोणत्याही प्रकारची विनंती एनसीबीला करण्यात आलेली नाही. अशी चर्चा होती की, रणवीर सिंहने दीपिकाच्या चौकशी दरम्यान तिच्यासोबत येण्याची विनंती केली होती.

तो कथितपणे म्हणाला होता की, दीपिका नर्व्हस होते त्यामुळे त्यालाही चौकशीदरम्यान तिच्यासोबत येऊ द्यावे. एनसीबीने या बातमीचं खंडन केलंय.

दरम्यान शनिवारी एनसीबी दीपिकाची चौकशी करेल. तर आज शुक्रवारी करिश्मा प्रकाश आणि धर्मा प्रॉडक्शनचा एक्झुक्युटिव्ह प्रोड्यूसर क्षितिज प्रसादची चौकशी होणार.

तसेच अभिनेत्री रकुलप्रीत सिंहची सुद्धा चौकशी सुरू आहे. दीपिकासोबतच अभिनेत्री सारा अली खान हिलाही एनसीबीने समन्स पाठवला आहे. तिची सुद्धा शनिवारी चौकशी होईल.

दीपिकाचं नाव जया साहाची कंपनी मॅनेजर करिश्माच्या डॅग चॅटमधून समोर आलं होतं. याचा खुलासा सुशांत सिंह राजपूत केसमधील ड्रग्स प्रकरणाच्या तपासादरम्यान एनसीबीने केला होता.

एनसीबीच्या हाती ड्रग चॅट लागली असून त्यात दीपिका पादुकोण आणि करिश्माचं नाव आहे. या दोघी ड्रगबाबत बोलत आहेत. दीपिकाने करिश्माला विचारले होते की, 'तुझ्याकडे माल आहे का?' यावर करिश्माने उत्तर दिलं होतं की, 'हो...पण मी बांद्र्याला आहे'.

यावर करिश्मा अमितचं नाव घेत म्हणाली की, अमित घेऊन येऊ शकेल. यावर दीपिका म्हणाली होती की, 'यस प्लीज'. काही वेळाने करिश्मा म्हणाली की, 'अमित घेऊन येतोय'.

नंतर दीपिकाने विचारले की, 'हॅश आहे ना?'. तर करिश्मा म्हणाली 'हॅश नाही गांजा आहे'. या चॅटच्या आधारावर एनसीबीने दीपिका समन्स पाठवला आहे.

Read in English