PHOTOS : ही चिमुकली आहे आजघडीची लोकप्रिय अभिनेत्री, ओळख हिची ‘फुल्ल संस्कारी’

Published: May 11, 2021 06:54 PM2021-05-11T18:54:43+5:302021-05-11T19:04:20+5:30

होय, साऊथची ही सुप्रसिद्ध अभिनेत्री तुम्हाला स्क्रिनवर कधीच तोकड्या कपड्यांमध्ये दिसणार नाही.

काळ बदलला, तसा सिनेमा बदलला. चित्रपटाच्या नट्या ग्लॅमरस दिसण्यासाठी अंगप्रदर्शनाचा आधार घेतला. पण अपवाद असतातच. किर्ती सुरेश ही अशीच एक अपवाद.

होय, साऊथची सुप्रसिद्ध अभिनेत्री किर्ती सुरेश तुम्हाला स्क्रिनवर कधीच तोकड्या कपड्यांमध्ये दिसणार नाही.

तिला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या अभिनयाचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात. तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याची आणि फॅशन सेन्सची नेहमीच चर्चा केली जाते.

किर्ती तिच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर तिचे नेहमीच फोटो पोस्ट करत असते. त्यातील किर्तीचे अनेक फोटो हे आपल्याला भारतीय पेहरावात पाहायला मिळतात.

वेस्टर्न कपड्यांमध्ये तिचे खूपच कमी फोटो सोशल मीडियावर दिसून येतात. तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर 33 लाखांहून अधिक लोक तिला फॉलो करतात.

किर्ती सुरेश गेल्या अनेक वर्षांपासून दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत असून तिच्या अभिनयाइतकीच तिच्या सौंदयार्ची देखील नेहमीच चर्चा केली जाते.

किर्तीला महांती या तेलुगू चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून तिने या चित्रपटात महांती ही मुख्य भूमिका साकारली आहे.

या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटात तिच्यासोबतच दलकीर सलमान, शालिनी पांडे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

किर्ती सुरेश ही अभिनेत्री दाक्षिणात्य इंडस्ट्रीत अतिशय प्रसिद्ध असून तिने तेलगू, तमीळ आणि मल्याळम या तिन्ही भाषांमध्ये काम केले आहे.

किर्तीचे आई-वडील दोघेही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अतिशय प्रसिद्ध असून त्यांच्या पावलावर पाऊल टाकत तिने या क्षेत्रात पदार्पण केले होते. अभिनेत्री मेनका आणि निर्माते सुरेश कुमार यांची किर्ती ही मुलगी असून तिने वयाच्या आठव्या वषार्पासून अभिनय करायला सुरुवात केली आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :TollywoodTollywood