करेंगे सबकी छुट्टी...! हे साऊथ सुपरस्टार उडवणार अक्षय, सलमान, अजय देवगणची झोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 08:00 AM2020-08-06T08:00:00+5:302020-08-06T08:00:02+5:30

येत्या काळात बॉलिवूडसोबतच साऊथ स्टार्सचे एकापेक्षा एक भारी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या सिनेमांवर एक नजर...

प्रभास- बाहुबली फेम प्रभासचा एक दमदार सिनेमा येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाचे नाव आहे राधे-श्याम. या सिनेमात प्रभास व पूजा हेगडे लीड रोलमध्ये आहेत.

प्रभास - प्रभासचाच ‘प्रभास 21’ या सिनेमाचीही घोषणा झालीय. यात प्रभाससोबत दिसणार आहे ती बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण. दीपिकाने या सिनेमासाठी 21 कोटी इतकी भरभक्कम फी घेतल्याचे मानले जात आहे.

यश- केजीएफ हा कन्नड सुपरस्टार यशचा सिनेमा सुपरडुपर हिट ठरला होता. बॉलिवूडमध्येही या सिनेमाने धूम केली होती. आता या सिनेमाचा सीक्वल ‘केजीएफ- चॅप्टर 2’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विशेष म्हणजे यात यात संजय दत्त व रवीना टंडन हे बॉलिवूड स्टार्सही असल्याने प्रेक्षक आतुरतेने या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.

ज्युनिअर एनटीआर व रामचरण तेजा - बाहुबली फेम दिग्दर्शक एसएस राजमौली यांचा आरआरआर या सिनेमाकडे प्रेक्षक डोळे लावून बसले आहेत. यात ज्युनिअर एनटीआर व रामचरण तेजा लीड भूमिकेत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटही यात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याने प्रेक्षक क्रेजी झाले आहेत.

अल्लू अर्जुन - अल्लू अर्जुन सध्या पुष्पा या सिनेमात बिझी आहे. या सिनेमाचा हिंदी व्हर्जनद्वारे अल्लू अर्जुन बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री करतोय.

विजय देवरकोंडा - ‘अर्जुन रेड्डी’ स्टार विजय देवरकोंडा अनन्या पांडेसोबत बॉलिवूडमध्ये जबरदस्त डेब्यू करतोय. या सिनेमाचे नाव आहे ‘फायटर’.

धनुष - धनुषचा ‘अतरंगी रे’ या सिनेमाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यात धनुषसोबत सारा अली खान लीड रोलमध्ये आहे. अक्षय कुमार यात एका विशेष भूमिकेत दिसणार आहे.

नागार्जुन - ब्रह्मास्त्र हा आगामी सिनेमा तसा रणबीर कपूर व आलिया भटचा सिनेमा आहे. पण यात साऊथ सुपरस्टार नागार्जुनचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. नागार्जुनला पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

Read in English