एखाद्या डॉलप्रमाणे दिसते करिना कपूर आणि करिश्मा कपूरची ही चुलत बहीण, पाहा तिचे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 06:27 PM2021-04-07T18:27:08+5:302021-04-07T18:34:48+5:30

करिना आणि करिश्माच्या या चुलत बहिणीचे नाव आलिया असून ती शशी कपूर यांची नात आहे.

शशी कपूर यांचा मुलगा कुणालची ही मुलगी असून लाईमलाईटपासून दूर राहाणेच ही पसंत करते.

आलिया गेल्या अनेक वर्षांपासून लंडनमध्ये राहाते.

करिनाचा मुलगा तैमुर अली खानच्या पहिल्या वाढदिवसाच्या फोटोत आपल्याला तिला पाहायला मिळाले होते.

आलिया लंडनमध्ये राहात असली तरी तिचे करिना, करिश्मा या तिच्या चुलत बहिणींसोबत नातं खूपच चांगले आहे.

आलियाचे कपूर कुणाल यांनी जुनून, लोहा यांसारख्या चित्रपटात काम केले होते. त्यांना चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून यश मिळवता आले नाही.

कुणाल हे फोटोग्राफर असून जगातील प्रसिद्ध फोटोग्राफरमध्ये त्यांची गणना होते.

आलिया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटला आपल्याला तिचे विविध फोटो पाहायला मिळतात.