अशी रंगली ‘मणिकर्णिका’ची सक्सेस पार्टी! पाहा, फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 12:49 PM2019-03-04T12:49:48+5:302019-03-04T12:53:47+5:30

‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर १०० कोटींचा टप्पा पार केला. यानंतर रंगली ती ‘मणिकर्णिका’ची सक्सेस पार्टी. या पार्टीत ‘मणिकर्णिका’ कंगना राणौत झाशीच्या राणीच्या अवतारात दिसली. भाच्याला कडेवर घेऊन कंगनाने या पार्टीत एन्ट्री केली.

‘मणिकर्णिका’ हा चित्रपट गत २५ जानेवारीला प्रदर्शित झाला होता. चार आठवड्यांत या चित्रपटाने १०० कोटींची कमाई केली.

‘मणिकर्णिका’च्या सक्सेस पार्टीत कंगनाचे अख्खे कुटुंब हजर होते.

‘मणिकर्णिका’ रिलीजपूर्वी आणि रिलीजनंतरही अनेक कारणांनी वादात सापडला. करणी सेनेने रिलीजपूर्वी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला होता.

कंगनाने या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारली होती. यातील अनेक भागांचे दिग्दर्शनही तिने केले होते.

कंगना तिच्या परखड व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते. ‘मणिकर्णिका’नंतर महिला योद्धांवर चित्रपट बनवण्याचा इरादा कंगनाने यावेळी बोलून दाखवला.

अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने सक्सेस पार्टीला हजेरी लावली. कंगनासोबत तिने अशी मस्त पोज दिली.

अंकिता लोखंडेने ‘मणिकर्णिका’तून बॉलिवूड डेब्यू केला होता.

‘मणिकर्णिका’त अंकिताने झलकारी बाईची भूमिका साकारली होती.

कंगनाच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगायचे तर ती लवकरच मेंटल है क्या आणि पंगा या चित्रपटात दिसणार आहे.