बॉलिवूड अभिनेत्रीचे ठरलेले लग्न मोडले, वर्षभरानंतर केला यावर खुलासा

Published: May 5, 2021 07:33 PM2021-05-05T19:33:28+5:302021-05-05T19:44:48+5:30

दोघांचे नातं संपुष्टात आले आहे.मात्र अद्याप यामागचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी साखरपुडा केला होता.

बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या गोष्टी रोज घडत असतात.कोणाचे तरी अफेअर सुरु होते तर कुणाचं तरी नातं संपत.

मिळालेल्या माहितीनुसार ब्रेकअपच्या लिस्टमध्ये आणखीन एक नाव सामिल झाले आहे ते महक चहल आणि अश्मित पटेल यांचं.

दोघांचे नातं संपुष्टात आले आहे. मात्र अद्याप यामागचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी साखरपुडा केला.

आता ते लग्न कधी करणार याची उत्सुकता सगळ्यांना असतानाच दोघांनी साखरपुडा मोडल्याचे जाहीर केले .यानंतर दोघांनीही यावर बोलणे टाळले होते.

शेवटी दिलेल्या एका मुलाखतीत महक चहलने याबाबत खुलासा केला आहे. खरंतर इतका मोठा निर्णय घेणे खरंच खूप कठीण होतं.

पण जेव्हा आपण एकमेकांसोबत राहायला लागतो तेव्हाच आपल्याला समोरच्या माणसाचे खरे गुण कळतात. त्याच दरम्यान जाणवले की,अश्मित माझ्यासाठी योग्य पार्टनर नाही.

लग्नानंतर पश्चाताप करत बसण्यापेक्षा मी आधीच काही गोष्टी स्पष्ट केल्या. त्यामुळे शेवटी लग्न न करणे हाच चांगला पर्याय होता.

आमच्या ब्रेकअपनतर मी वर्षभर गोव्यातच राहिले. यातून सावरल्यानंतर आता मी पुन्हा मुंबईत आले आहे.

महक चहल आता सगळे काही विसरुन 'खरतरों के खिलाडी ११' मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत.

महक चहल हिने दबंग सलमान खानच्या वॉन्टेड सिनेमातही काम केले आहे.

याशिवाय बिग बॉस सीझन पाचमध्येही ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. याशिवाय छोट्या पडद्यावरील कवच या मालिकेतही तिने काम केले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!