Photos: कधी पावडर आणि तेलाच्या जाहिरातीत काम करायची कृति खरबंदा, आईच्या एका सल्ल्याने बदलले नशीब

Published: October 29, 2020 02:22 PM2020-10-29T14:22:31+5:302020-10-29T14:22:31+5:30

कृति खरबंदा आज आपला 30वा बर्थडे सेलिब्रेट करते आहे. कृतिने खूप कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं (Photo Instagram)

कृतिचा जन्म 29 ऑक्टोबर 1990 साली दिल्लीतील पंजाबी कुटुंबात झाला. कृतिने 2009 मध्ये 'बोनी' तेलुगु चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा फारशी कमाल दाखवू शकला नाही, मात्र तिच्या अभिनयाचे कौतुक झाले.(Photo Instagram)

कृतिने एका मुलाखती दरम्यान सांगितले तिला जाहिरातीत काम करायला खूप आवडायचे फिल्मी इंडस्ट्रीमध्ये येण्याचा तिचा कोणताचा प्लान नव्हता. मात्र तिच्या आईने या गोष्टीवर जोर दिला आणि त्यानंतर तिने फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले. (Photo Instagram)

इमरान हाश्मीच्या 'राज: रीबूट' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. तिला खरी ओळख मिळाली ती 'शादी मैं जरुर आना' या सिनेमातून. (Photo Instagram)

कृतिने 'गेस्ट इन लंडन', 'शादी में जार आना', 'वीरे की वेडिंग', 'यमला पगला दिवाना फिर से', 'हाऊसफुल 4' आणि 'पागलपंती' या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

कृति अभिनेता पुल्कित सम्राटला टेड करते आहे. दोघे एकमेकांसोबतचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

कृतिने ज्वेलरी डिझायनिंगचा डिप्लोमा केला आहे, पण कॉलेजपासून तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!