90's च्या काळात गाजलेल्या 'दीवाने तो दीवाने हैं' ची गायिका आता काय करते माहितीये का? दिसते पूर्वीपेक्षा जास्त सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 03:59 PM2022-01-18T15:59:15+5:302022-01-18T16:09:20+5:30

Shweta shetty:श्वेताने बॉलिवूडमधील 'मांगता है क्या' (रंगीला), 'काले काले बाल' (ज़िद्दी), 'दिल टोटे टोटे हो गया' (बिच्छू) अशी कितीतरी गाणी गायली आहेत.

90 चा काळ अनेक कारणांसाठी खास आहे. या काळातील चित्रपट, गाणी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. केवळ इतकंच नाही तर आजही ती गाणी, चित्रपट टीव्हीवर लागल्यानंतर प्रेक्षक आवडीने पाहतात. त्यातलंच एक गाणं म्हणजे 'दीवाने तो दीवाने हैं' या गाण्याने ९० चा काळ तुफान गाजवला होता.

'दीवाने तो दीवाने हैं' हे गाणं प्रसिद्ध गायिका श्वेता शेट्टी (Shweta Shetty) यांनी गायलं होतं. त्यांच्या आवाजाने हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं होतं.

श्वेता शेट्टीने जर्मनीत राहणाऱ्या Clemens Brandt यांच्यासोबत लग्न केलं आणि तेव्हापासून तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला.

श्वेता शेट्टी यांची अनेक गाणी त्या काळी गाजली. परंतु, लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ही गायिका अचानक कुठे गायब झाली असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळेच ही गायिका सध्या काय करते, कशी दिसते हे जाणून घेऊयात.

श्वेताने बॉलिवूडमधील 'मांगता है क्या' (रंगीला), 'काले काले बाल' (ज़िद्दी), 'दिल टोटे टोटे हो गया' (बिच्छू) अशी कितीतरी गाणी गायली आहेत.

१९९८ मध्ये श्वेताला स्क्रीन अवॉर्ड्समध्ये दीवाने तो दीवाने हैं या गाण्यासाठी बेस्ट फिमेल पॉप आर्सिस्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

श्वेताने Clemens Brandt सोबत लग्न केल्यानंतर ती जर्मनीमध्ये कायमस्वरुपी स्थायिक झाली. परंतु, या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. ते विभक्त झाले.

श्वेता अद्यापही जर्मनीत राहत असून तेथे ती योगा क्लास घेते. तसंच २०२० मध्ये तिने पुन्हा कलाविश्वात कमबॅक केलं.

कोविडच्या काळात तिने डरो न हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं. त्यानंतर तिने 2021 मध्ये 'JMHM' च्या माध्यमातून ऑफिशिअली कलाविश्वात कमबॅक केलं आहे.