PHOTOS: देश सोडून रातोरात अमेरिकेला पोहोचली होती नर्गिस फाखरी, कारण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 01:29 PM2020-10-20T13:29:39+5:302020-10-20T15:14:47+5:30

रॉकस्टार, मद्रास कॅफे आणि 'हाऊसफुल 3' सारख्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री नर्गिस फाखरी आज आपला 41 वा वाढदिवस साजरा करते आहे. नर्गिसचा जन्म 20 ऑक्टोबर 1979 साली न्यूयॉर्कमध्ये झाला होता. (Photo Instagram)

2016 मध्ये जेव्हा नर्गिस आपला मोस्ट अवेडेट सिनेमा 'हाऊसफुल 3'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. तेव्हा अचानक एका रात्री तिला देश सोडून अमेरिकेला जावं लागलं. तिचं रातोरात अमेरिकेला जाण्यामागील कारण काय हे कोणालाही माहिती नव्हते. लोक वेगवेगळ्या चर्चा करु लागले. (Photo Instagram)

त्या काळात नर्गिसविषयी जी चर्चा रंगली होती त्यात अधिकतर लोक तिचे उदय चोप्रासोबत ब्रेकअप झाल्यामुळे ती भारत सोडून गेल्याचे बोलत होते. पण ज्यावेळी नर्गिसचे अमेरिकेला जाण्याचे खरं कारण समोर आले तेव्हा सगळे हैराण झाले. (Photo Instagram)

नर्गिसने यावर अखेर आपलं मौनं सोडून तिचं अमेरिकाला जाण्या मागचे खरं कारण सांगितले. नर्गिसला गंभीर आजार झाला होता ज्यामुळे ती देश सोडून अमेरिकेला जावं लागलं. नर्गिसला अर्सेनिक आणि लीड पॉयझनिंग नावाचा आजार झाला होता. नर्गिस म्हणाली, हा आजार अन्न किंवा पाण्यासारख्या कोणत्याही प्रकारात होऊ शकतो. जेव्हा डॉक्टरांनी माझं चेकअप केलं तेव्हा तो घाबरला होता, कारण आजाराने खूप बळावला होता. मी डॉक्टरांना विचारलं मला काय करायलं हवं. (Photo Instagram)

यानंतर नर्गिसने यावर उपचार सुरु केले. डॉक्टरांनी त्यांचे उपचार सुरु केसे. नर्गिसने कोणतीच रिस्क नाही घेतली, तिने यावर डॉक्टरांचे उपचार न घेता आयुर्वेदावर आधारित नॅथरोपथी उपचार सुरु केले. सहा महिन्यानंतर तिने पुन्हा एकदा आपली टेस्ट केली तेव्हा आजार नव्हता. (Photo Instagram)

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, नर्गिस ‘तोरबाज’मध्ये दिसणार आहे. यात तिच्यासोबत संजय दत्त, राजू चड्ढा, पुनीत सिंग आणि अन्य कलाकार दिसणार आहेत. (Photo Instagram)

नर्गिस शेवटची ‘अमावस’मध्ये दिसली होती, हा सिनेमा बॉक्स आॅफिसवर काही कमाल दाखवू शकला नाही. (Photo Instagram)

नर्गिस चित्रपटांपेक्षा अफेअरमुळेच चर्चेत राहिली. सध्या नर्गिस जस्टिन संटोसला डेट करतेय.नर्गिस व जस्टिनचे रोमॅन्टिक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Instagram)

नर्गिसचा बॉयफ्रेन्ड जस्टिन हा एक शेफ आहे. नर्गिस कॅलिफोर्नियाला राहते तर जस्टिन न्यूयॉर्कचा राहणारा आहे. (Photo Instagram)