IN PICS : मनीषा ते करिना... कधीकाळी Controversy मुळे चर्चेत आल्या होत्या बॉलिवूडच्या या बाला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 08:00 AM2020-08-14T08:00:00+5:302020-08-14T08:00:02+5:30

या प्रकरणांनी माजली होती खळबळ, पाहा कोण कोण आहे यादीत

ममता कुलकर्णी 90 च्या दशकातील बोल्ड अभिनेत्री. 1991 ते 2003 या काळात बॉलिवूड गाजवणारी ममता आज बॉलिवूडमधून बाद झाली आहे. एका मुलाखतीत ममताने दिग्दर्शक राज कुमार संतोषी यांच्या गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर बॉलिवूडमध्ये काम मिळणे बंद झाल्याचा आरोपही तिने केला होता.

बिपाशा बासू - बिपाशा बासूचा दिवंगत नेते अमर सिंग यांच्यासोबतच्या एका कामुक संवादाची क्लिप व्हायरल झाली होती. बिपाशाने ही क्लिप खोटी असल्याचे सांगत सगळे आरोप नाकारले होते.

करिना कपूर - करिना कपूर एकेकाळी शाहिद कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. याचदरम्यान 2004 मध्ये शाहिद व करिनाचा एक किसींग एमएमएस लीक झाला होता. या एमएमएसने खळबळ माजली होती. अर्थात हा एमएमएस नकली असल्याचा दावा करिना व शाहिद दोघांनीही केला होता.

श्वेता प्रसाद बासू - श्वेता प्रसाद बासू हिला 2014 साली एका सेक्स रॅकेटमध्ये सामील असल्याच्या आरोपाखाली अटक झाली होती. तिने हे सर्व तिने नाकारले होते. पुढे कोर्टातही हे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत.

पायल रोहतगी - टीव्ही अभिनेत्रीने दिबाकर बॅनर्जींवर गैरवर्तनाचा आरोप करून खळबळ निर्माण केली होती. दिबाकर यांनी हे आरोप नाकारले होते.

गीतिका त्यागी- अभिनेत्री व निर्माती गीतिका त्यागी हिने सुभाष कपूर यांच्यावर छेडखानीचा आरोप केला होता. याप्रकरणी सुभाष कपूर यांना अटकही झाली होती.

प्रीती जैन- कॉकटेल, द डेडली कॉम्बिनेशन अशा सिनेमात झळकलेली अभिनेत्री प्रीती जैन हिने दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्यावर आरोप केला होता. मधुर यांनी कथितरित्या बलात्कार केल्याचा आरोप तिने ठेवला होता. या आरोपातून मधुर निर्दोष सिद्ध झालेत. मात्र माझा 16 वेळा बलात्कार झाला आणि यानंतर मला प्रचंड मानसिक यातनांमधून जावे लागले, असा दावा प्रीतीने केला होता.

वीना मलिक - पाकिस्तानी अभिनेत्री वीना मलिक बॉलिवूडच्या अनेक सिनेमात दिसली. 2010 मध्ये तिचा एक किसींग व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओतील मुलगा रंजन वर्मा असल्याचा दावा केला गेला होता. रंजनने ‘जिंदगी 50-50’ या सिनेमात वीनासोबत काम केले होते.

रिया सेन - रिया सेन व अश्मित पटेल या दोघांचा एक किसींग एमएमएस लीक झाला होता. बिग बॉसमध्ये अश्मितने हा एमएसएस खरा असल्याची कबुली दिली होती.

मनीषा कोईराला - मनीषा कोईराला हिने दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावर खळबळजनक आरोप केला होता. सुभाष घई यांनी कथितरित्या एका अभिनेत्रीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास सांगितल्याचा आरोप मनीषाने केला होता. यानंतर मनीषाने सुभाष घईसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला होता.

Read in English