शुभमंगल सावधान...! अभिनेता विष्णु विशालसोबत ज्वाला गुट्टाने बांधली लग्नगाठ, पाहा वेडिंग अल्बम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 03:55 PM2021-04-22T15:55:33+5:302021-04-22T16:04:33+5:30

Jwala Gutta Vishnu Vishal's wediing : हळद, मेहंदी ते लग्न... पाहा एक से बढकर एक फोटो

भारताची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा आणि अभिनेता विष्णू विशाल हे लव्हबर्ड्स आज लग्नबेडीत अडकले. (Jwala Gutta Vishnu Vishal's wediing)

दोघांचाही विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या लग्नात ज्वाला आणि विष्णुचा थाटही बघण्यासारखा होता.

लग्नाआधी मेहंदी, हळदीचा सोहळाही रंगला. हळदी व मेहंदीचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पिवळ्या रंगाच्या साडीत ज्वाला कमालीची सुंदर दिसतेय. पिवळ्या फुलांनी सजलेला मंडपात पिवळ्या रंगाच्या साडीतील ज्वाला दृष्ट लागावी इतकी सुंदर दिसतेय.

अभिनेता होण्याआधी विष्णू तामिळनाडूकडून क्रिकेट खेळत होता. कदाचित खेळ हाच प्रेमातील दुवा ठरला आणि ज्वाला व विष्णु एकमेकांच्या जवळ आलेत.

खूप दिवसांपासून ज्वाला व विष्णू दोघे प्रेमात होते. गेल्यावर्षी म्हणजेच ज्वालाच्या 37 व्या वाढदिवशी या दोघांनी साखरपुडा केला होता.

ज्वाला गुट्टा सध्या बॅडमिंटन अकॅडमी चालवते. तिने कॉमनवेल्थ खेळामध्ये, वर्ल्ड चॅम्पियनशिप, आशियाई चॅम्पियनशिप, तसेच दक्षिण आशियाई चॅम्पियनशिप यामध्ये पदकं मिळविली आहेत.

विष्णू विशालला तर दक्षिण चित्रपटांतील सुपरस्टार म्हणून ओळखले जाते. पण तो एक क्रिकेटपटू म्हणूनही ओळखला जातो.

क्रिकेट सोडल्यानंतर त्याने आपले नाव बदलून विष्णू असे नवे नामकरण केले. आता तो प्रसिद्ध अभिनेता आहे.

ज्वाला गुट्टाचे हे दुसरे लग्न आहे. याआधी तिने बॅडमिंटनपटू चेतन आनंदसोबत लग्न केले होते. मात्र 2011 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला आहे.

विष्णूचे सुद्धा हे दुसरे लग्न आहे. याआधी त्यानं रजनी नटराजन सोबत लग्न केले होते. मात्र नंतर ते विभक्त झाले.

टॅग्स :TollywoodTollywood