बायकोसोबत जॉन अब्राहमचा ब्रेकफास्ट पाहून नेटकर्‍यांना आवरले नाही हसू; वाचा, काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 06:04 PM2021-04-16T18:04:43+5:302021-04-16T18:15:09+5:30

सध्या जॉन अब्राहम व त्याची पत्नी प्रिया रूंचालचा एक फोटो चर्चेत आहे. या फोटोत प्रिया व जॉन सकाळची न्याहारी करताना दिसत आहेत.

जॉन अब्राहम (john abraham ) बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. जॉन आपल्या रिल लाईफबद्दल भरभरून बोलतो. पण आपल्या रिअल लाईफबद्दल बोलणे मात्र त्याला अजिबात आवडत नाही. त्याची पत्नी प्रिया ही सुद्धा लाईमलाईटपासून दूर राहते.

सध्या मात्र जॉन व त्याची पत्नी प्रिया रूंचालचा एक फोटो चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोत प्रिया व जॉन सकाळची न्याहारी करताना दिसत आहेत.सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने हा फोटो शेअर केला आहे. जॉन व प्रियाच्या ब्रेकफास्टमध्ये काय तर ग्रीन सॅलड.

आता फिटनेस फ्रिक सेलिब्रिटींसाठी ग्रीन सॅलॅड म्हणजे, आवडता नाश्ता. पण सामान्य माणसांना तो कसा पचणार? नेमक्या याचवरून अनेक युजर्सनी जॉन व प्रिया ट्रोल केले.

प्लेटमध्ये हे काय बकरीचे खाद्य ठेवलेय? असा प्रश्न एका युजरने या फोटोवर कमेंट करत विचारला.

जॉन आणि प्रिया 2014 मध्ये विवाह बंधनात अडकले.

प्रियाचा जन्म अमेरिकेत झाला असून, ती एक इन्व्हेस्टमेंट बॅँकर आहे.

प्रियासोबत लग्न करण्याअगोदर जॉनचे अभिनेत्री बिपाशा बसू हिच्याशी अफेयर होते. दोघे लग्न करतील असे सगळ्यांना वाटत होते. परंतु काही कारणास्तव त्यांच्यात ब्रेकअप झाले.

जॉनची पत्नी प्रिया ही अतिशय प्रायव्हेट पर्सन आहे. अगदी जॉनपेक्षाही प्रायव्हेट. तिची हीच गोष्ट जॉनला सर्वाधिक आवडते.

प्रिया इन्व्हेस्टमेंट बँकर आहे़ सोबत जॉनच्या फुटबॉल टीमचे कामही ती हाताळते.