IN PICS : जया यांनी सिक्युरिटी वाढवली, पण तरिही रेखा अमिताभ यांना भेटल्याच...!

Published: May 7, 2021 08:07 PM2021-05-07T20:07:22+5:302021-05-07T20:17:35+5:30

अमिताभ बच्चन व रेखा यांची प्रेमकहाणी कदाचित कधीही जुनी होणार नाही. या लव्हस्टोरीइतकी चर्चा कदाचित कुठल्याच दुस-या लव्हस्टोरीची झाली आहे. या लव्हस्टोरीचे किस्से तर आजही ऐकवले जातात.

अमिताभ बच्चन व रेखा यांची प्रेमकहाणी कदाचित कधीही जुनी होणार नाही. या लव्हस्टोरीइतकी चर्चा कदाचित कुठल्याच दुस-या लव्हस्टोरीची झाली आहे. या लव्हस्टोरीचे किस्से तर आजही ऐकवले जातात.

असाच एक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. होय, पडद्यावर तर अमिताभ-रेखा यांची केमिस्ट्री जबरदस्त होतीच/ पण पडद्यामागेही त्यांच्या केमिस्ट्रीची चर्चा सुरु झाली होती. या चर्चांमुळे जया बच्चन अस्वस्थ होणे साहजिकच होते.

अशात जया यांनी रेखा यांना अमिताभ यांच्यापासून दूर ठेवण्याचा खटाटोप सुरु केला. काहीही झाले तरी मी माझ्या पतीला दूर जाऊ देणार नाही, जणू हे त्यांनी मनाशी पक्के ठरवले होते.

याचदरम्यान कुलीच्या सेटवर अमिताभ यांचा अपघात झाला. अमिताभ यांची प्रकृती गंभीर होती. रूग्णालयात अमिताभ मृत्यूशी झुंज देत होते आणि बाहेर त्यांचे तमाम चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते.

अमिताभ यांच्या काळजीने संपूर्ण देश चिंतेत होता. रेखा यांची अवस्था काय झाली असेन, तुम्ही समजू शकता. अमिताभ यांना एकदा बघण्यासाठी त्यांची तगमग सुरु होती.

पण रेखा यांनी अमिताभ यांना भेटायला रूग्णालयात यावे, हे जया यांना कसे मान्य होणार? अनेक सेलिब्रिटी अमिताभ यांना पाहण्यासाठी रूग्णालयात येत होते. पण रेखा यांनाच भेटू द्यायची जया यांची तयारी नव्हती.

असे म्हणतात की, त्यावेळी केवळ रेखा यांना रूग्णालयात दाखल होता येऊ नये, म्हणून जया यांनी पर्सनल सिक्युरिटी हायर केली होती.

रिपोर्टनुसार, सिक्युरिटी कडक होती, अमिताभ यांना भेटणे दूर पण रूग्णालयात एन्ट्री मिळणेही कठीण होते. रेखा यांची तगमग आणखीच वाढली होती. पण त्यांनी अखेर मार्ग शोधलाच.

पांढरी साडी नेसून त्या भल्या पहाटे रूग्णालयात पोहोचल्या. पांढ-या साडीतील रेखा यांना कुणीच ओळखू शकले नाही. रेखा यांनी अमिताभ यांना पाहिले आणि ते ठीक आहे, हे पाहून त्या तशाच रूग्णालयातून बाहेर पडल्या. यात किती तथ्य आहे हे आम्हाला माहित नाही. पण हा किस्सा आजही ऐकवला जातो, हे तितकेच खरे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!