जया बच्चन यांच्यानुसार अमिताभ नव्हे तर हा अभिनेता आहे सगळ्यात हँडसम, त्या आहेत त्याच्या मोठ्या फॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 06:00 AM2021-04-09T06:00:00+5:302021-04-09T06:00:02+5:30

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांचा आज 73वा वाढदिवस आहे. 1992 मध्ये जया बच्चन यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांन नऊ फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत.

जया बच्चन यांनी वयाच्या पंधराव्या वर्षापासून फिल्मी जगात पाऊल ठेवले. 1963 सत्यजित रे यांच्या महानगर चित्रपटात त्यांनी सहायक भूमिका साकारली होती.

जया बच्चन यांनी 1972 मध्ये 'बन्सी बिरजू' चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत पहिल्यांदा काम केले होते.1973 मध्ये अमिताभ व जया यांनी ‘जंजीर’मध्ये एकत्र काम केले. याच चित्रपटादरम्यान दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.

अमिताभ आणि जया यांची जोडी त्यांच्या फॅन्सना प्रचंड आवडते. अमिताभ हे तर बॉलिवूडचे सुपरस्टार आहेत.

जया या अमिताभ यांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या असल्या तरी अमिताभ यांच्यापेक्षा जास्त हँडसम एक अभिनेता असल्याची त्यांनी एका कार्यक्रमात कबुली दिली होती.

धर्मेंद्र हे सगळ्यात हँडसम हिरो असून मी त्यांच्या दिसण्याच्या प्रेमात होते अशी कबुली कॉफी विथ करण या कार्यक्रमात जया यांनी दिली होती.

शोले या चित्रपटात वीरूच्या प्रेयसीची म्हणजेच बसंतीची भूमिका साकारायला आवडली असती अशी देखील कबुली त्यांनी या कार्यक्रमात दिली होती.

गुड्डी या चित्रपटात जया बच्चन धर्मेंद्र यांच्या फॅन असल्याचे दाखवण्यात आले होते. खऱ्या आयुष्यात देखील त्या धर्मेंद्र यांच्या खूप मोठ्या फॅन आहेत.

धर्मेंद्र यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीविषयी देखील कॉफी विथ करण या कार्यक्रमात जया यांनी सांगितले होते. त्यांनी सांगितले होते की, धर्मेंद्र यांना माझी पहिल्यांदा ओळख करून दिली, त्यावेळी मी इतकी नर्व्हस झाली होती की मी सोफ्याच्या मागे लपली होती. त्यांनी पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते. ते खूपच छान म्हणजे ग्रीक गॉडप्रमाणे दिसत होते.