'मुंबई सागा' चित्रपटातील इमरान हाश्मीचा लूक आला समोर, दिसणार पोलिसाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 07:15 AM2020-02-08T07:15:00+5:302020-02-08T07:15:00+5:30

दिग्दर्शक संजय गुप्ताने नुकतेच त्यांचा आगामी चित्रपट 'मुंबई सागा'चा लूक शेअर केला आहे.

संजय गुप्ताने सोशल मीडियावर अभिनेता इमरान हाश्मीचा फोटो शेअर केला आहे. यात तो पोलिसाच्या भूमिकेत दिसतो आहे.

सोशल मीडियावर इमरान हाश्मीचा फोटो व्हायरल होतो आहे.

याआधी जॉन अब्राहमचादेखील या चित्रपटातील लूक समोर आला होता.

या फोटोत जॉन ग्रे कुर्ता व व्हाईट पायजमामध्ये दिसला होता.

या फोटोत जॉनच्या गळ्यात चेन व कपाळावर टीळा लावलेला दिसतो आहे.

जॉन या चित्रपटात एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे.