PICS : ‘लगान’ची गौरी फारच बदलली! आता अशी दिसते अभिनेत्री ग्रेसी सिंग!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 04:45 PM2021-07-20T16:45:03+5:302021-07-20T17:00:37+5:30

ग्रेसी सिंग हे नाव आठवताच आठवतो तो ‘लगान’ हा सिनेमा. बॉलिवूड अभिनेत्री ग्रेसी सिंगचा आज वाढदिवस.

बॉलिवूड अभिनेत्री ग्रेसी सिंगचा आज (20 जुलै) वाढदिवस. ग्रेसी सिंग हे नाव आठवताच आठवतो तो ‘लगान’ हा सिनेमा.

‘लगान’ या सिनेमानंंतर ग्रेसी सिंग रातोरात स्टार बनली. आमिरच्या अपोझिट तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली.

आयुष्यात एकदा असं काही करावं की, लोकांनी आयुष्यभर लक्षात ठेवावं, असं ग्रेसीला वाटे. त्यामुळेच ‘लगान’ या सिनेमात तिनं अगदी जीव ओतला.

या भूमिकेत ती इतकी रमली होती की, सेटवरच्या लोकांशीही बोलायची नाही. सेटवरचे सर्व लोक पाठीमागं तिला गर्विष्ठ म्हणू लागले होते.

लगानमुळे गौरी साकारणा-या ग्रेसी सिंगचं करियर पालटलं होतं. अजय देवगणसह 'गंगाजल' आणि संजय दत्तसह 'मुन्नाभाई एमबीबीएस' या सिनेमात ग्रेसीने काम केलं हे दोन्ही सिनेमा सुपरहिट ठरले होते.

याशिवाय तिने अनिल कपूर आणि प्रिती झिंटा स्टारर अरमान या सिनेमात काम केलं होतं. मात्र या निवडक सिनेमांनंतर ग्रेसीच्या सिने करिअरची गाडी रुळावरुन घसरली

एकामागून एक तिचे सिनेमा फ्लॉप झाले. तिला सिनेमात काम मिळणं कठीण झालं. मात्र करिअर सुरु ठेवण्यासाठी आणि पैसा कमावण्याकरिता तिने आपला मोर्चा रुपेरी पडद्यावरुन छोट्या पडद्याकडे वळवला.

ग्रेसीसाठी छोट्या पडद्यावर काम करणं ही बाब काही नवी नाही. तिने आपल्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासूनच केली होती. १९९७ साली अमानत मालिकेतून तिनं छोट्या पडद्यावर एंट्री मारली होती.

ग्रेसी सिंहमध्ये नायिकेत असावे असे सर्व गुण होते, परंतु अभिनेत्रीचे एक-दोन चित्रपट फ्लॉप होताच तिला काम मिळणे बंद झाले. असं म्हणतात की, चित्रपटांमध्ये फारसे यश न मिळाल्याने नंतर अभिनेत्री अध्यात्माकडे वळली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!