Friendship Day 2020 : ही दोस्ती तुटायची नाय...! बॉलिवूडचे हे कलाकार आहेत एकमेकांचे जिगरी यार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 12:20 PM2020-08-02T12:20:50+5:302020-08-02T12:31:41+5:30

बॉलिवूडमध्ये कोणी कोणाचे मित्र नाही, असे म्हणतात. पण या जोड्यांनी हे खोटे ठरवले. रूसवे, फुगवे यांच्यातही झालेत. पण या बॉलिवूडच्या सेलिब्रिटींची मैत्री आजही कायम आहे.

शाहरुख खान आणि काजोल : एकेकाळी या जोडीने रसिकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. ऑनस्क्रीन रोमान्स करणाऱ्या या जोडीमध्ये ऑफस्क्रीन मात्र निखळ मैत्री आहे.

करण जोहर आणि काजोल : सुरुवातीला करण जोहर आणि काजोल यांची मैत्री आणि भांडण कोणापासूनच लपलेले नाही. पण हे दोघे आजही पक्के मित्र आहेत आणि भांडणे विसरून पुन्हा एकमेकांसोबत उभे राहतात. काजोल-करणची मैत्री चित्रपट ‘कभी खुशी कभी गम’सोबत सुरु झाली होती. मध्यंतरी दोघांत वादही झाला. पण मैत्री तुटली नाही.

अजय देवगन आणि रोहित शेट्टी : अजय देवगन आणि रोहित शेट्टी बालपणापासूनचे मित्र आहेत. हेच कारण आहे की, रोहितच्या जास्तीत जास्त चित्रपटांत अजय लीड रोलमध्ये दिसतो. पण काही काळापूर्वी रोहितने शाहरुख खानला ‘दिलवाले’ मध्ये कास्ट केले. या गोष्टीवरून अजय आणि रोहित यांच्या मैत्रीत अंतर आले होते. पण ते तेवढ्यापुरतेच. आजही दोघांची अतूट मैत्री आहे.

सलमान खान आणि संजय दत्त: सलमान आणि संजय दत्त बेस्ट फ्रेंड्स आहेत. जेव्हा संजय दत्त जेलमध्ये होता सलमान त्याला भेटण्यासाठीही गेला होता. तसेच संजय अनेकदा म्हणाला आहे की, सलमान त्याचा चांगला मित्र आहे आणि नेहमी राहील.

अमृता अरोरा व करीना कपूर : अमृता अरोरा आणि करिना कपूर दोघीही बेस्ट फ्रेन्ड आहेत. दोघीही एकमेकींशिवाय राहू शकत नाही, असे म्हटले तरी वावगे होणार नाही.

आलिया भट आणि वरूण धवन : या दोघांची मैत्री कोणाला ठाऊक नाही. दोघांनीही करिअरची सुरुवात एकाच चित्रपटातून केली हौती. त्यानंतर अनेक चित्रपट त्यांनी एकत्र केले आहेत.

रणबीर कपूर आणि अयान मुखर्जी : रणबीर व अयान यांची यारी जुनी आहे. त्यांची मैत्री त्यांच्या सिनेमांमध्ये देखील पाहायला मिळते.

फराह खान आणि शाहरुख खान : फराह खान आणि शाहरुख खान बॉलिवूडमधील सर्वात पक्क्या मित्रांपैकी एक आहेत. पण काही वर्षांपूर्वी या दोघांच्या मैत्रीत अंतर आले होते. सुमारे 5 वर्षे दोघांमध्ये कोल्ड वॉर चालले. पण आता दोघांचे नाते पुन्हा सामान्य झाले आहेत.

जुही चावला आणि शाहरूख खान : जुही व शाहरूख दोघीही खूप चांगले मित्र आहेत. आजही त्यांची मैत्री टिकून आहे.

रणवीर सिंग आणि अर्जून कपूर : रणवीर आणि अर्जून दोघे बेस्ट फ्रेंड आहेत. सोशल मीडियावर देखील दोघे एकमेकांची टर उडवत असतात. पार्टी आणि एखाद्या कार्यक्रमात देखील ब-याचदा दोघे एकत्र दिसतात.