Frieda Pinto Birthday: लग्नाआधीच आई होणार फ्रिडा पिंटो, या फोटोग्राफरसोबत केला साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 06:41 PM2021-10-18T18:41:40+5:302021-10-18T18:46:38+5:30

Frieda Pinto Birthday: आपल्या सुरेख अभिनयाने अल्पावधीत जगभरात आपली ओळख बनवणारी अभिनेत्री फ्रिडा पिंटो हिचा आज वाढदिवस आहे. देव पटेल याच्यासोबत तिची रियल लाईफमध्ये जोडी जमली होती. मात्र काही काळाने दोघांचे नाते तुटले होते. देव पटेल सोबत ब्रेकअप झाल्यानंतर फ्रिडा पिंटोने Rohan Antao याच्यासोबत साखरपुडा केला आहे.

आपल्या सुरेख अभिनयाने अल्पावधीत जगभरात आपली ओळख बनवणारी अभिनेत्री फ्रिडा पिंटो हिचा आज वाढदिवस आहे. फ्रिडा पिंटो हिने स्लमडॉग मिलेनियर चित्रपटात लतिकाची भूमिका केली होती. याच चित्रपटातील नायक असलेल्या देव पटेल याच्यासोबत तिची रियल लाईफमध्ये जोडी जमली होती. मात्र काही काळाने दोघांचे नाते तुटले होते. देव पटेल सोबत ब्रेकअप झाल्यानंतर फ्रिडा पिंटोने Rohan Antao याच्यासोबत साखरपुडा केला आहे. तसेत ती आता आई बनणार आहे.

हल्लीच फ्रिडा पिंटो हिने आपल्या बेबी शॉवरचे काही फोटो सोशल मीडयावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये फ्रि़डा पिंटो सुंदर व्हाईट गाऊनमध्ये आपला बेबी बंप फ्लाँट करत आहे.

फ्रिडाचे हे फोटो सोशल मीडियावर खूप पसंत केले जात आहेत.

फ्रिडा तिचा होणारा नवरा Rohan Antao सोबत पोझ देत आहे.

व्हाईट गाऊनमध्ये पुन्हा फ्रिडाचा लूक फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

फ्रिडाचे इन्स्टाग्राम अकाऊंट पाहून तिने बाळाचे आगमन होण्यापूर्वी आपले घर रिनोवेट केल्याचे दिसत आहे.

देव पटेलसोबत सुमारे सहा वर्षे डेट केल्यानंतर फ्रिडा पिंटो त्याच्यापासून वेगली झाली होती. देवसोबत फ्रिडा सिरियर रिलेशनशिपमध्ये होती. त्यामुळे या दोघांच्या लग्नाची चर्चाही होत होती.