वर्षभरानंतरही ब्रेकअपच्या दु:खातून सावरली नाहीय इलियाना, पोस्टमधून दिसल्या तिच्या वेदना...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 12:25 PM2020-08-15T12:25:04+5:302020-08-15T12:38:47+5:30

२०१२ मध्ये इलियानाने अनुराग बासूच्या 'बर्फी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. त्यानंतर ती 'मै तेरा हिरो' आणि 'रूस्तम' सिनेमातही दिसली होती.

बॉलिवूड आणि साउथ सिने इंडस्ट्रीत आपल्या अदाकारीने सर्वांच्या मनात घर करणारी इलियाना डीक्रूज वर्ष होऊनही ब्रेकअपमधून सावरलेली नाही. गेल्याच्या सुरूवातीला इलियाना आणि तिचा फोटोग्राफर बॉयफ्रेन्ड एंड्रूयू नीबोन यांच्यात सगळं काही ठिक होतं. पण अचानक दोघांमध्ये काहीतरी बिनसलं आणि ब्रेकअपची बातमी समोर आली.

इलियाना तेव्हापासून इंडस्ट्रीपासूनही दूर आहे. इन्स्टाग्रामवर ती तिचे वेगवेगळे फोटो शेअर करत असते. असं वाटत होतं की, ती ब्रेकअपच्या दु:खातून बाहेर आली आहे. पण असं झालं नाही. तिचं दु:खं पुन्हा एकदा समोर आलं.

नोव्हेंबर २०१९ मध्ये इलियानाने कन्फर्म केलं होतं की, तिचं ब्रेकअप झालं. अशात गुरूवारी इलियानाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. ज्यातून तिच्या ब्रेकअपच्या जखमा अजूनही भरल्या नसल्याचं दिसलं.

इलियानाने एक कोटेशन शेअर केलं. यात तिने लिहिले की, 'यावर्षी मला सर्वात कडू औषध प्यावं लागलं आहे. आता मी पुन्हा त्या लोकांशिवाय उभी कशी राहू, जे मला माझ्या आयुष्यात मोठ्या काळासाठी राहतील असं वाटत होते. मला स्वत:ला असं जाणवलं की, काही वेगळ्या गोष्टी कराव्या लागतील. कारण तुम्ही एकमेव अशी व्यक्ती आहात जे स्वत: आपल्या पायावर उभी राहू शकते'.

इलियानाने या पोस्टखाली लिहिले की, 'हे सर्वात कठिण नव्हतं. पण हो कठिण होतं.

याआधी आपल्या ब्रेकअपबाबत बोलताना इलियानाने पिंकविलाला सांगितले होते की, 'माझ्यासाठी नेहमी हीच बाब महत्वाची होती की, जेव्हा तुम्ही एखाद्या रिलेशनमध्ये असता, तेव्हा एकटे नसता. ही दोन व्यक्तींची बाब आहे. त्यामुळे नेहमी एकच व्यक्ती सगळं करत आणि म्हणत राहू शकत नाही. तुम्हाला प्रायव्हसीची देखील काळजी घ्यावी लागते'.

ब्रेकअपनंतर इलियानाला अनेकदा ट्रोलही करण्यात आलं. इलियानाने २००६ मध्ये तेलुगू 'देवदासू' सिनेमातून डेब्यू केलं होतं. यासाठी तिला फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता.

त्यानंतर तिने साउथमधील अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. यात 'पोकिरी', 'किक', 'जुलायी', 'केडी' आणि 'ननबन'सारख्या सिनेमांचा समावेश आहे.

२०१२ मध्ये इलियानाने अनुराग बासूच्या 'बर्फी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. त्यानंतर ती 'मै तेरा हिरो' आणि 'रूस्तम' सिनेमातही दिसली होती.

बॉलिवूडमध्ये ती शेवटची २०१९ मध्ये आलेल्या पागलपंती सिनेमात दिसली होती. आता ती अभिषेच बच्चनच्या 'द बिग बुल' सिनेमात दिसणार आहे.