IN PICS : साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरचं खरं नाव तुम्हाला माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 04:30 PM2022-01-21T16:30:19+5:302022-01-21T16:39:41+5:30

Jr. NTR : ज्युनिअर एनटीआरने प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान मिळविलं आहे. विशेष म्हणजे ज्युनिअर एनटीआर या नावाने प्रसिद्ध असलेल्या या कलाकाराचं हे खरं नाव नसून दुसरंच आहे.

साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर सध्या ‘आरआरआर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. साहजिकच आपल्या या आवडत्या स्टारबद्दल जाणून घ्यायला चाहते उत्सुक असतात.

तुम्हाला ठाऊक असेलच की, ज्युनिअर एनटीआरचे वडील नंदमुरी हरिकृष्णा हे प्रसिद्ध अभिनेते आणि राजकारणी होते. ज्युनिअर एनटीआर हा आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि दाक्षिणात्य सुपरस्टार एनटी. रामाराव यांचा नातू आहे.

पण ज्युनिअर एनटीआरचं खरं नाव तुम्हाला ठाऊक आहे का? तर ज्युनिआर एनटीआरचं खरं नाव ‘तारक’ (नंदमुरी तारक रामा राव) आहे. मग ज्युनिअर एनटीआर हे नाव कसं पडलं? तर आजोबांमुळे.

होय, आजोबांच्या म्हणजेच एन.टी. रामा राव यांच्या चित्रपटातून त्याने कलाविश्वात पदार्पण केलं. एन. टी. रामा राव यांचा नातू असल्यामुळे लाक त्याला ज्युनिअर एनटीआर याच नावाने ओळखू लागले आणि पुढे जगभरात याच नावाने त्याला ओळख मिळाली.

बालकलाकार म्हणून ज्युनिअर एनटीआरने फिल्मी करिअरची सुरूवात केली. ‘रामायणम’ या तेलगू चित्रपटामधून ज्युनिअर एनटीआरने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्याच्या पहिल्याच सिनेमाने धमाका केला.

पण आश्चर्य वाटेल की, पहिला चित्रपट इतका हिट होऊनही ज्युनिअर एनटीआरने अभिनय क्षेत्रामधून ब्रेक घेतला. अर्थात 2001 मध्ये पुन्हा त्याने दमदार सुरूवात केली.

लवकरच ज्युनिअर एनटीआर ‘आरआरआर’ या चित्रपटात दिसणर आहे. या चित्रपटात तो रामचरण, अजय देवगन, आलिया भट्ट यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

टॅग्स :TollywoodTollywood