सारख्याच दिसणाऱ्या 'या' सेलिब्रेटी भाऊ-बहिणींबद्दल तुम्हाला माहित आहे का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 04:26 PM2020-03-27T16:26:57+5:302020-03-27T16:32:48+5:30

शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी शिल्पा आणि शमिता या बी-टाऊनच्या आवडत्या बहिणी आहेत. शमिताने "मोहब्बतें" या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यु केला. त्यानंतर ती "जेहर"आणि "कॅश" यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली.

श्रद्धा कपूर आणि सिद्धांत कपूर श्रद्धाचा मोठा भाऊ सिद्धांतने "हसीना पारकर", "पल्टन", "बोंबैरिया" आणि "जजबा" या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

मौनी रॉय आणि मुखर रॉय मौनीचा लहान भाऊ मुखर अगदी तिच्या सारखाच दिसतो. सोशल मीडियावर मौनी भावासोबत फोटो शेअर करत असते.

भुमी पेडणेकर आणि समीक्षा पेडणेकर भुमी आणि समीक्षा अगदी जुळ्या बहिणीच दिसतात.समिक्षा ही एक वकील आहे.

भारती सिंग आणि पिंकी सिंग पिंकी भारतीची मोठी बहिण आहे. या दोघींमध्ये उत्तम बॉंड आहे.

अमृता राव आणि प्रितिका राव प्रितिका ही टिव्ही इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'बेन्तेहा' या मालिकेतून प्रितिका घराघरात पोहचली.

निशा अग्रवाल आणि काजल अग्रवाल निशा ही एक अभिनेत्री आहे. "येमंदी ए वेला" चित्रपटातून तिने डेब्यु केला असून तिने आणखी दोन चित्रपटात काम केले आहे. निशा आणि काजल यांच्यातील असलेला बॉंड सोशल मीडियावर दिसून येतो.

तापसी पन्नू आणि शगुन पन्नू शगून प्रसिद्धीपासून दूर असली तरी या दोघी बहिणी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवत आहे. या दोघींमध्ये अत्यंत उत्तम बॉंड आहे.