वादग्रस्त विधानं आणि गाण्यांचा आहे सरदार, पण वैवाहिक जीवनावर मौन बाळगून असतो दिलजीत दोसांज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2021 09:42 AM2021-01-06T09:42:15+5:302021-01-06T10:15:01+5:30

आज ६ जानेवारीला दिलजीत दोसांज त्याच्या वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने त्याच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफबाबत काही खास गोष्टी जाणून घेऊ.

पंजाबी गायक, अभिनेता दिलजीत दोसांज गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. शेतकरी आंदोलनावरून त्याच्यात आणि कंगना रणौतमध्ये झालेल्या ट्विटर वॉरने तो चांगलाच गाजत आहे. आज ६ जानेवारीला दिलजीत दोसांज त्याच्या वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने त्याच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफबाबत काही खास गोष्टी जाणून घेऊ.

दिलजीत दोसांजचा जन्म ६ जानेवारी १९८४ ला दोसांज कला, पंजाबच्या जालंधर जिल्ह्यात झाला होता. त्याचे वडील बलबीर सिंह हे पंजाब रोडवेजमध्ये कर्मचारी होते. तर त्याची आई एक होममेकर आहे. त्याचा परिवार नंतर लुधियानाला शिफ्ट झाला होता.

दिलजीतला बालपणापासूनच म्युझिकमध्ये आवड होती. जेव्हा तो शाळेत होता तेव्हापासून तो स्थानिक गुरूद्वारामध्ये कीर्तन करायला जात होता. असंच त्याचं सिंगिंग करिअर सुरू झालं. दिलजीतला त्याच्या अभिनयाआधी त्याच्या गायकीसाठी ओळखलं जातं.

त्याचा पहिला अल्बम होता 'Ishq Da Uda Ada'. हा २००४ मध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर त्याचा दुसरा अल्बम आला. तिसऱ्या अल्बमनंतर दिलजीत अधिक पॉप्युलर झाला. त्याने त्याचा द नेक्स्ट लेव्हल अल्बम हनी सिंहसोबत केला होता. त्यातील पूर्ण ९ गाणी पॉप्युलर झाली होती.

दिलजीतने २०११ मध्ये मेनस्ट्रीम पंजाबी सिनेमा एन्ट्री घेतली. त्याने लायन ऑफ पंजाब सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. सिनेमा नाही चालला पण गाणी हिट झाली. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, हनी सिंहसोबत दिलजीतचा ट्रॅक अमेरिकेतील ऑफिशिअल एशियन डाउनलोड चार्टमध्ये नंबर १ वर होता.

२०१२ मध्ये रिलीज झालेल्या दिलजीतचा सिनेमा जट एंड ज्युलिएट पंजाब सिनेमातील त्याच्या करिअरमधील सर्वात सुपरहिट सिनेमा ठरला होता. २०१३ मध्ये दिलजीतचं नवं गाणं प्रॉपर पटोला रिलीज झालं. रॅपर बादशाहने कंपोज केलेलं हे गाणं सुपरहिट ठरलं होतं.

त्याच्या इतर सुपरहिट गाण्यांमध्ये नचदी दे, भगत सिंह, जट भूखदा फिरे, गोलियां, सूरमा, सेल्फी, होला होला, पटियाला पेग, इश्क हाजिर है, फैज-ए-नूर, 5 तारा, डू यू नो, लैंबरगिनी, रात दी गेडी, जिंद माही, काइली एंड करीनासहीत अनेक गाण्यांचा समावेश आहे.

बॉलिवूडमध्ये दिलजीतने 'तेरे ना लव्ह हो गया' सिनेमातून गाणं गाउन एन्ट्री घेतली होती. तो या म्युझिक व्हिडीओ मध्येही दिसला होता. त्याने २०१६ मध्ये उडता पंजाब सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं. हा सिनेमा हिट ठरला. त्यानंतर तो फिल्लोरी, वेलकम टू न्यूयॉर्क, सूरमा, अर्जुन पटियाला, गुड न्यू़ज या सिनेमात दिसला आहे. दिलजीतने आतापर्यंत केलेल्या कामातून आणि गाण्यांमधून हिंदी प्रेक्षकांमध्ये आपली एक वेगळी ओळख बनवली आहे.

प्रोफेशनल लाइफबाबत दिलजीत मोकळेपणाने बोलतो. पण लग्नाबाबत तो मौन बाळगून असतो. रिपोर्ट्सनुसार, दिलजीतच्या पत्नीचं नाव संदीप कौर आहे आणि त्याला एक मुलगा आहे. रिपोर्ट्सनुसार दोघांमध्ये सगळं काही ठिक नाही. त्यामुळे तो त्यांच्याबाबत काहीच बोलत नाही.

Read in English