Dhanush-Aishwarya divorce: धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांतच्या लग्नाची झाली होती जगभर चर्चा, लग्नात खर्च केले होते कोट्यावधी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 06:13 PM2022-01-18T18:13:35+5:302022-01-18T18:13:35+5:30

Dhanush-Aishwarya Rajinikanth divorce: साऊथ सुपरस्टार धनुष (Dhanush) आणि त्याची पत्नी ऐश्वर्या (Aishwarya Rajinikanth)ने लग्नाच्या १८ वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

साउथचा अभिनेता धनुष आणि सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतने १८ वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. धनुषने त्याचे वैवाहिक नाते संपुष्टात आल्याची माहिती सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

धनुष आणि ऐश्वर्या या दोघांनी सांगितले की, त्यांना स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी वेळ द्यायचा आहे. आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आमच्या गोपनीयतेचा आदर करा.

धनुषने १८ नोव्हेंबर २००४ रोजी सुपरस्टार रजनीकांत यांची मोठी मुलगी ऐश्वर्यासोबत लग्न केले. दोघांचे हे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. या लग्नाची जगभर चर्चा झाली होती.

१८ नोव्हेंबरला रजनीकांत यांच्या घरी धनुष आणि ऐश्वर्या यांचे मोठ्या थाटामाटात दोघांचे लग्न झाले. पारंपारिक तमिळ रितीरिवाजानुसार हे लग्न पार पडले. या दोघांच्या लग्नाला अमिताभ बच्चन, जया बच्चन, हेमा मालिनी यांच्यासह अनेक स्टार्स पोहोचले होते. कोट्यवधी रुपये खर्च करून हा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला होता.

आता धनुष आणि ऐश्वर्याने लग्नाच्या १८ वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. धनुष आणि ऐश्वर्याला दोन मुले आहेत.

धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांच्या वेगळ्या होण्याचा निर्णय ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)