दीपिका पादुकोणच्या बर्थ डे पार्टीला आलिया-रणबीरने लावले ‘चार चाँद’, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2021 10:29 AM2021-01-06T10:29:07+5:302021-01-06T10:52:45+5:30

मंगळवारी दीपिका पादुकोणचा वाढदिवस दणक्यात साजरा झाला.

मंगळवारी दीपिका पादुकोणचा वाढदिवस दणक्यात साजरा झाला. मग काय पार्टी तर रंगणार? फार मोठी नाही पण दीपवीरने डिनर पार्टी ठेवली आणि दीपिकाच्या या डिनर पार्टीला काही सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

दीपिकाच्या या बर्थ पार्टीला आलिया भट, रणबीर कपूर, करण जोहर, अनन्या पांडे, इशान खट्टर, सिद्धांत चतुर्वेदी अशा अनेकांनी हजेरी लावली.

दीपवीर पार्टीचे होस्ट होते. त्यांनी मीडियाला अशी मस्त झक्कास पोज दिली. यावेळी दोघेही मॅचिंग आऊटफिटमध्ये दिसले.

आलिया व रणबीर या पार्टीचे आकर्षणाचे केंद्र ठरले. आलियासोबत तिची बहीण शाहीन ही सुद्धा दिसली. तिघांनी एकत्र पोज दिली.

रणबीर कपूर अशा ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट लूकमध्ये दिसला.

आलियाने अगदी फुल ब्लॅकमध्ये ग्लॅमरस एन्ट्री घेतली

अनन्या पांडे व करण जोहरने एकत्र पोज दिली.

ईशान खट्टर अशा स्टायलिश लूकमध्ये दिसला.

सिद्धांत चतुर्वेदी

सिद्धार्थ आनंद व त्याची पत्नी