'दंगल' फेम फातिमा सना शेख दिसली ग्लॅमरस अंदाजात, फोटो पाहून व्हाल दंग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 05:57 PM2019-01-12T17:57:41+5:302019-01-12T18:00:17+5:30

'दंगल' चित्रपटातून अभिनेत्री फातिमा सना शेखने बॉलिवूडमध्ये आपली ओळख बनवली. नुकतेच तिने आपला २६वा वाढदिवस साजरा केला.

यावेळी ती ग्लॅमरस अंदाजात जुहू येथे दिसली.

फातिमाने 'दंगल' चित्रपटात आमीर खानच्या मुलीची भूमिका केली होती व तिच्या भूमिकेची सगळीकडून खूप प्रशंसा झाली होती.

त्यानंतर फातिमा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिच्यासोबत आमीर खान, अमिताभ बच्चन व कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होते.

'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपटांकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. मात्र हा चित्रपट बॉक्सऑफिसवर अयशस्वी ठरला.

फातिमाचे अपारशक्ति खुरानासोबत अफेयर असल्याचे बोलले जात आहे.