शाहरूखचे सीक्रेट मॅरेज ते कॅटची खोटी ओळख...; या अफवांनी हादरली होती बॉलिवूड इंडस्ट्री!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 07:33 PM2021-08-25T19:33:03+5:302021-08-25T19:42:58+5:30

बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दलच्या अफवा तुम्हा-आम्हाला नव्या नाहीत. करिनापासून तर शाहरूखपर्यंत बॉलिवूडचे अनेक स्टार्स चित्रविचित्र अफवांचे बळी ठरले, आज त्याच्यावर एक नजर...

शाहरूख खान व प्रियंका चोप्रा यांच्या सीक्रेट मॅरेजचीही अफवा तुम्ही ऐकली असेलच. दोघांनी गौरीला अंधारात ठेवून सीक्रेट मॅरेज केल्याची ही अफवा होती.

करिना कपूरही अफवांची बळी ठरली. नवव्या वर्गात असताना करिना प्रेग्नंट होती, अशी अफवा कधीकाळी होती.

कतरिना कैफचे खरे आडनाव टर्कोट आहे. कतरिना बॉलिवूडमध्ये नवखी असताना तिच्याबद्दल एक मोठी अफवा पसरली होती. कतरिना भारतात बनावट पासपोर्ससह राहतेय, अशी ही अफवा तेव्हा पसरली होती.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही पूनम सिन्हांची खरी मुलगी नसून रिना रॉय व शत्रुघ्न सिन्हाची खरी मुलगी आहे, अशीही अफवा होती. या अफवेमुळे पूनम सिन्हा चांगल्याच भडकल्या होत्या.

कंगना राणौतने तिचा तत्कालीन बॉयफ्रेन्ड अध्ययन सुमनवर काळी जादू केल्याचीही अफवा होती.

काजोल व अजय देवगण यांच्याबद्दलही अशीच एक अफवा पसरली होती. अजय कंगनासोबत रिलेशनशिपमध्ये असून काजोलला हे कळताच तिने अजयपासून दूर होण्याचा निर्णय घेतल्याची अफवा कधीकाळी पसरली होती.

बॉलिवूडचा दिग्गज दिग्दर्शक व निर्माता करण जोहर व अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा रिलेशनशिपमध्ये आहेत, अशी एक अफवा एकेकाळी पसरली होती. करणने सिद्धार्थला लॉन्च केले,यामुळे या अफवेला आणखीच खतपाणी मिळाले होते.

Read in English