सुहाना खान ते न्यासा देवगणपर्यंत; विदेशातील 'या' विद्यापीठांमध्ये स्टारकिड्स घेतायेत शिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 02:15 PM2021-09-29T14:15:00+5:302021-09-29T14:15:00+5:30

Star kids: कलाकारांच्या मुलांच्या शिक्षणाविषयी, लाइफस्टाइलविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात.

बॉलिवूड स्टार किड्स कायमच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असतात. त्यामुळेच कलाकारांच्या या मुलांच्या शिक्षणाविषयी, लाइफस्टाइलविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. म्हणूनच कोणत्या सेलिब्रिटींची मुलं कुठे शिक्षण घेतात ते पाहुयात.

खुशी कपूर - दिवगंत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लेक खुशी कपूर सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह आहे. अनेकदा ती तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

खुशीने नुकतेच न्युयॉर्क फिल्म अकॅडमीमध्ये अभिनयाचे धडे घेतले आहेत. त्यानंतर आता ती ली स्ट्रासबर्ग थिएटर अॅण्ड फिल्म इंस्टीट्यूडमध्ये प्रवेश घेण्याच्या तयारी आहे.

सुहाना खान - बॉलिवूड किंग खानची लाडकी लेक सुहाना खान साऱ्यांनाच ठावूक आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच सुहाना चर्चेत आली असून तिचा फॅनफॉलोअर्स झपाट्याने वाढल्याचं दिसून येतं.

सुहानाने २०१९ मध्ये लंडनमधील आर्डिंगली कॉलेज येथून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर आता ती न्युयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये पुढील शिक्षण पूर्ण करत आहे.

न्यासा देवगण - अजय देवगण आणि काजोल यांची मोठी लेक न्यासा सध्या सिंगापूरमधील दक्षिण पूर्व अशियाच्या युनायटेड वर्ल्ड कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे.

न्यासा विदेशात एकटीच राहत असल्यामुळे सुरक्षेच्या हेतुने अजय-काजोलने तिच्यासाठी एका पॉश भागात घर खरेदी केलं आहे.

अरहान खान- मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा लेक अरहानदेखील विदेशात शिक्षण घेतो.

अलिकडेच अरहान अमेरिकेत पुढील शिक्षणासाठी गेला आहे.