बिग बींच्या नावाचं मंदिर ते करीनाला हिऱ्याचा हार; असेही आहेत सेलिब्रिटींचे जबरा फॅन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 05:43 PM2021-09-16T17:43:07+5:302021-09-16T17:51:09+5:30

Bollywood celebs fans: जगभरामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचे असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच कलाकारांच्या प्रेमापोटी चाहते वाट्टेल ते करायला तयार असतात.

जगभरामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचे असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच कलाकारांच्या प्रेमापोटी चाहते वाट्टेल ते करायला तयार असतात. म्हणूनच, सध्या आपण अशा काही चाहत्यांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या आवडत्या कलाकारांसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत.

अभिनेता शाहरुख खानचा एक चाहता लखनऊमध्ये राहत असून त्याने त्याच्या संपूर्ण घरामध्ये शाहरुखचे पोस्टर लावले आहेत. इतकंच नाही तर त्याने त्याचं नावही Vishahrukh असं ठेवलं आहे.

अभिनेता अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता पार सातासमुद्रापारपर्यंत पोहोचली आहे. अनेक ठिकाणी अमिताभ यांची देवासमान पूजा केली जाते. इतकंच नाही तर कोलकात्तामध्ये अमिताभ यांच्या नावाचं एक मंदिरदेखील उभारण्यात आलं आहे. या मंदिरात 'जय श्री अमिताभ' असा जपही करण्यात येतो.

अभिनेत्री कंगना रणौत कायमच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. त्यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.मात्र, ज्या प्रमाणे तिचे ट्रोलर्स आहेत तसेच तिचे काही चाहतेदेखील आहेत. यापैकीच एका चाहत्याने कंगना मोठ्या संख्येने पत्र पाठवले होते. इतकंच नाही तर कंगना त्यांची गर्लफ्रेंड आहे असंही ते सांगतात.

सलमान खानचा एक चाहता त्याला प्रेम रतन धन पायोच्या सेटवर भेटला होता. विशेष म्हणजे सलमानसोबत एक फोटो काढता यावा यासाठी या चाहत्याने सेटच्या बाहेर उपोषण सुरु केलं होतं.

प्रियांकाच्या एका चाहत्याने तिला ५ फूट उंच पेटिंग गिफ्ट म्हणून दिली होती. चाहत्याचं हे गिफ्ट प्रियांकाला प्रचंड आवडलं होतं. त्यामुळे प्रियांकाने पर्सनली त्यांचे आभार मानले होते.

शाहिद कपूरच्या एका चाहत्याने चक्क पर्वाच्या टोकावर त्याच्या हैदर चित्रपटाचं पोस्टर लावलं होतं.

करीना कपूरच्या एका चाहत्याने तिच्यासाठी असंख्य लव्ह लेटर्स पाठवले होते. विशेष म्हणजे करीनाने या लेटर्सचं उत्तर दिलं नाही. म्हणून या चाहत्याने चक्क तिच्यासाठी ४० लाखांचा हिऱ्यांचा हार भेट म्हणून पाठवला होता.