IN PICS : 100 कोटींपेक्षा अधिकचा बजेट आणि रिझल्ट काय तर हे 8 सुपरफ्लॉप सिनेमे...!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 09:18 AM2021-04-22T09:18:00+5:302021-04-22T09:25:48+5:30

सिनेमे प्रेक्षकांच्या जोरावर चालतात. काही सिनेमे लोकांना आवडतात आणि हिट होतात. काही सिनेमे मात्र सुपरफ्लॉपच्या यादीत जाऊन बसतात. आता हेच बघा या या सिनेमांवर पाण्यासारखा पैसा खर्च झाला, पण तरीही या सिनेमांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली.

रा-वन हा सिनेमा यापैकीच एक. 2011 साली रिलीज झालेल्या या सिनेमावर किती पैसा खर्च झाला तर 130 कोटी. या सिनेमाने हा खर्च वसूलही केला. पण तरीही हा सिनेमा सुपरफ्लॉप ठरला. कारण काय तर तो प्रेक्षकांनी नाकारला.

बॉम्बे वेल्वेट या सिनेमावरही 118 कोटींचा खर्च झाला. रणबीर कपूर, अनुष्का शर्मा असे बडे स्टार्स घेऊन सिनेमा तयार झाला. पण 2015 मध्ये रिलीज झालेला हा सिनेमा सुपरफ्लॉप ठरला. या सिनेमाने केवळ 30 कोटी रूपये कमावले.

मोहनजोदडो... हृतिक रोशनच्या या सिनेमावर 138 कोटी रूपये खर्च केले गेलेत. सिनेमाने कमावले किती तर जेमतेम 74 कोटी.

रणबीर कपूर व कतरिना कैफचा जग्गा जासूस. या सिनेमाचा बजेट किती होता तर 131 कोटी. 2017 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाने कमाई केली ती फक्त 69 कोटींची.

सलमानचा ट्युबलाईट या सिनेमावरही 135 कोटी रूपये खर्च करण्यात आले. या सिनेमाने 156 कोटी कमाई केली. अर्थात वेगवेगळ्या माध्यमातून. पण तरिही हा सिनेमा सलमानच्या सुपरफ्लॉप सिनेमांपैकी एक ठरला.

झिरो या शाहरूख खानच्या बहुचर्चित सिनेमांवर तब्बल 270 कोटी खर्च झालेत. म्हणजे अगदी पाण्यासारखा पैसा खर्च केला गेला़ सिनेमाने कमाई केली 112 कोटींची.

ठग्स ऑफ हिंदुस्तान हा आमिरचा 2018 सालचा सर्वात फ्लॉप सिनेमा. या सिनेमावर 310 कोटी रूपये खर्च झाले. सिनेमाने जेमतेम 176 कोटी कमावले.

कलंक हा मल्टीस्टारर सिनेमा पाहून अनेकांचे डोळे दिपले. या सिनेमावर 137 कोटींचा खर्च झाला. सिनेमाने कमाई किती केली तर 93 कोटी.