मॉडेलिंगच्या दिवसांत ‘बिजली’ म्हणून ओळखली जायची संगीता बिजलानी, तुम्ही कधीही पाहिले नसतील तिचे हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 12:57 PM2020-07-09T12:57:19+5:302020-07-09T13:05:12+5:30

80 च्या दशकात बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री संगीता बिजलानी हिचा आज वाढदिवस.

आज संगीता बिजलानी 60 वर्षांची झाली.

1980 साली तिने मिस इंडियाचा किताब जिंकला. वयाच्या 16 व्या वर्षी संगीताने मॉडेलिंग सुरु केले होते.

मॉडेलिंग करिअरमध्ये तिने अनेक मोठमोठ्या ब्रँडसोबत काम केले.

मॉडेलिंगच्या दिवसात संगीताच्या ग्लॅमरवर सगळेच फिदा होते. तिच्या ग्लॅमरमुळे मॉडेलिंग दुनियेत तिला बिजली म्हणून ओळखले जात होते.

1988 साली कातिल या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

तिला खरी ओळख मिळाली ती 1989 साली आलेल्या ‘हथियार’ या सिनेमाने.

यानंतर त्रिदेव, जुर्म, योद्धा, खून का कर्ज अशा अनेक सिनेमांमध्ये ती झळकली.

करिअरच्या काळात तिच्या व सलमान खानच्या अफेअरच्या चर्चा ब-याच गाजल्या होत्या.

सलमान व संगीता लग्न करणार होते. असे म्हणतात की या लग्नाच्या पत्रिकाही छापल्या होत्या. पण अचानक हे नाते तुटले.

1996 साली संगीताने क्रिकेटपटू मोहम्मद अजहरूद्दीनसोबत लग्न केले. 2010 साली दोघांचा घटस्फोट झाला.

1996 साली आलेल्या ‘निर्भय’ या सिनेमात संगीता अखेरची झळकली. यानंतर तिने फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला. आता ती दिसते ती केवळ बॉलिवूडच्या इव्हेंटला आणि सलमानच्या घरच्या पार्ट्यांना.