कतरिना कैफचे हे फोटो बघून बसणार नाही डोळ्यांवर विश्वास, काय आहे कॅटचे खरे नाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 12:11 PM2020-07-16T12:11:02+5:302020-07-16T12:22:16+5:30

16 जुलै 1983 रोजी जन्मलेली कतरिना कैफ हिचा आज वाढदिवस. कॅटने केवळ वयाच्या 14 व्या वर्षी मॉडेलिंगची सुरुवात केली होती.

कतरिना कैफचे खरे नाव कतरिना टरकॉटा आहे. तिचे नाव बदलले कुणी तर जॅकी श्रॉफची वाईफ आयशा श्रॉफ हिने.

आयशाने प्रोड्यूस केलेल्या ‘बूम’मध्ये कतरिना लीड रोलमध्ये होती. हा कॅटचा पहिला सिनेमा. कतरिना टरकॉटा हे नाव भारतीय उच्चारू शकणार नाहीत. यामुळे आयशाने कॅटचे नाव बदलून कतरिना काजी करण्याचे ठरवले. पण सरतेशेवटी कतरिना कैफ या नावावर सगळे सहमत झालेत.

कॅटला लहानपणापासूनच ग्लॅमरचे जग खुणवत होते. त्यामुळे वयाच्या 14व्या वर्षी तिने मॉडेलिंगच्या दुनियेत पाऊल ठेवले आणि बघता बघता बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री म्हणून मिरवण्यापर्यंतचा पल्ला गाठला.

बॉलिवूडमध्ये नवखी असताना कॅटला हिंदी बोलता येत नव्हते. तिचा अभिनयही सुमार होता. हिंदी येत नाही, त्यात अभिनयाची बोंब. त्यामुळे त्याकाळात तिची बरीच खिल्ली उडवली गेली. हिंदीचं नाही तर अभिनयही न येणारी अभिनेत्री बॉलिवूडमध्ये टिकणारचं नाही, असे भाकित त्याकाळी अनेकांनी वर्तवले. तिला बरेच नकार पचवावे लागलेत.

अनेकांनी तिच्या अभिनयावर टीका केली तर अनेकांनी तिला नाचता येत नाही म्हणून, नाकं मुरडली. तिच्या हिंदीबद्दलही लोक नाही नाही ते बोललेतं.

पण कॅट जिगरबाज निघाली. तिने ही सगळी टीका पचवत, स्वत:ची अशी काही ओळख निर्माण केली की, लोकांची तोंड बंद झालीत. आज कॅटचे नाव बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते, ते म्हणूनच.

करिअरच्या सुरूवातीला तिने काही मल्याळम चित्रपटात काम करावे लागले. २००४ मध्ये मल्लीस्वरी आणि २००५ मध्ये आलेल्या अलारी पेडगू या मल्याळम चित्रपटात ती दिसली.

2003 मध्ये दिग्दर्शक कायजाद गुस्ताद यांनी तिला एका फॅशन शोमध्ये बघितले नसते तर कदाचित ती बॉलिवूडमध्ये आलीच नसती. या फॅशन शोमध्ये कॅटरिनाला पाहून कायजाद गुस्ताद यांनी तिला ‘बूम’ या चित्रपटात कास्ट केले.

दुस-्या वर्षी कॅटरिना सलमान खानच्या डोळ्यात भरली. ‘मैंने प्यार क्यों किया’मध्ये त्याने तिला कास्ट केले आणि हळूहळू सलमान व कॅटमधील जवळीक वाढली. पुढे तर सलमाननेच कॅटचे करिअर घडवले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

सलमान व कॅटच्या नात्याची चर्चा होत असताना अचानक कॅटच्या आयुष्यात रणबीर कपूर नावाचे वादळ आले. रणबीरसाठी कॅटने सलमानला सोडले. रणबीरच्या प्रेमात ती इतकी वेडी झाली होती की, त्याच्यासोबत लिव्ह इनमध्येही राहू लागली. पण हे प्रेम ऐन बहरात असतानांच अगदी अनपेक्षित या दोघांचेही ब्रेकअप झाले. पण याकाळातही सलमान तिच्या मदतीला धावून आला.

Read in English