IN PICS: ओरिजनल नाहीत हे 10 सुपरहिट सिनेमे, या चित्रपटांचे आहेत रिमेक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 03:05 PM2020-07-10T15:05:10+5:302020-07-10T15:12:49+5:30

या चित्रपटांची झाली चर्चा, पण ओरिजनल नव्हती ‘आयडिया’

बेटा - 1992 साली आलेला सुपरडुपर हिट ‘बेटा’ हा सिनेमा इंद्रकुमार यांनी दिग्दर्शित केला होता. हा सिनेमा ‘एंगा चिन्ना रासा’ या तामिळ सिनेमाचा रिमेक आहे. आधी या सिनेमाचे नाव ‘बडी बहू’ ठेवले जाणार होते. शिवाय श्रीदेवी ही या सिनेमासाठी पहिली पसंत होती. पण पुढे माधुरी व अनिल कपूर ही सुपरहिट जोडी या सिनेमात झळकली.

राजा बाबू - गोविंदा व करिश्मा कपूरचा हा सिनेमा ‘रसुकुट्टी’ या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. आधी हा सिनेमा जुही चावलाला मिळणार होता. तिने नकार दिल्यावर यात करिश्माची वर्णी लागली होती.

गोपी किशन- सुनील शेट्टीचा डबलरोल असलेला हा सिनेमा ‘अवसरा पुलिस 100’ या तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.

घरवाली बाहरवाली - 1998 साली आलेल्या या सिनेमात अनिल कपूर, रविना टंडन व रंभा लीड रोलमध्ये होता. हा सिनेमा ‘थाईकुलामे थाईकुलामे’ या तामिळ सिनेमाचा रिमेक आहे.

वो सात दिन - अनिल कपूर व पद्मिनी कोल्हापुरेचा सुपरहिट ‘वो 7 दिन’ हा सिनेमा ‘अन्था एजहू नाटकल’ या तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. ए. के. भाग्यराज यांनी हा तामिळ सिनेमा दिग्दर्शित केला होता. बोनी कपूर व सुरिंदर कपूर यांनी ‘वो 7 दिन’ प्रोड्यूस केला होता. या दोघांनाही ‘अन्था एजहू नाटकल’चे राईट्स विकत घेण्यासाठी बराच खटाटोप करावा लागला होता. संजीव कपूर, शबाना आझमी यांच्याकडून काही लाख उधार घेऊन बोनी कपूर यांनी या तामिळ सिनेमाचे हक्क विकत घेतले होते.

अंदाज - 1994 साली प्रदर्शित अंदाज हा सिनेमा ‘सुन्दरा कंडम’ या तामिळ सिनेमाचा रिमेक होता.

एक ही भूल - 1981 साली आलेला जीतेन्द्र व रेखाचा हा सुपरहिट सिनेमा ‘मौना गीतंगल’ या तामिळ सिनेमाचा आॅफिशिअल रिमेक आहे.

मिस्टर बेचारा - अनिल कपूर व श्रीदेवी स्टारर हा सिनेमा ‘वीटला विशेषंगा’ या तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. त्यावेळी 3.75 कोटी रूपयात बनलेल्या या सिनेमाने 5.84 कोटीची कमाई केली होती.

आखिरी रास्ता- हा सिनेमाही तामिळ सिनेमाचा रिमेक आहे. अ प्रिझनर्स डायरी या तामिळ सिनेमाचा हा रिमेक आहे. यात अमिताभ बच्चन, जया प्रदा व श्रीदेवी लीड रोलमध्ये होते.

मास्टरजी - राजेश खन्ना, श्रीदेवी, कादर खान अशी तगडी स्टार कास्ट असलेला 1985 साली प्रदर्शित ‘मास्टरजी’ हा सिनेमा ‘मुधानाई मुदिछु’ या तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक होता.