बी टाऊनचे हे तारे स्वत:पेक्षा ही करतात 'या' गोष्टीवर जीवापाड प्रेम...

Published: March 23, 2020 06:46 PM2020-03-23T18:46:12+5:302020-03-23T18:58:55+5:30

आलिया भट्टकडे पांढऱ्या रंगाची पर्शियन मांजर आहे. तिने या मांजरीचे नाव 'एडवर्ड' असे ठेवले आहे.

मलंग अभिनेत्री दिशा पाटनी प्राणीप्रेमी आहे तिच्याकडे एक मांजर आहे जीचे नाव 'जॅसमिन आहे' आणि दोन कुत्रे आहेत त्यांची नावे 'बेला' आणि 'गोकू' आहे.

सलमान खानकडे 'मोगली' नावाचा लॅब्राडोर कुत्रा आहे तर नेपोलियन जातीचा 'माय लव्ह' आणि फ्रेंच जातीचा 'वीर' असे दोन कुत्रे आहेत.

कलकीकडे 'डोसा' नावाची एक मांजर आहे जी तिने दत्तक घेतली आहे तर 'कियारा नावाची' एक कुत्री आहे.

रिचा चड्डाकडे दोन मांजरी आहेत ज्यांची नावे 'कमली' आणि 'जुगनी' आहे.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचे आपल्या कुत्र्यांवर फार प्रेम आहे आणि त्या कुत्र्याचे नाव 'रुडोल्फ' असे आहे.

श्रद्धा कपूरकडे लहासा अप्सो जातीचा कुत्रा आहे ज्याचे नाव 'श्यालोह' आहे. श्रद्धाला आपल्या कुत्र्यासोबत वेळ घालवणे फार आवडते

प्रियंका चोप्राकडे डायना नावाचा कुत्रा आहे. न्युयॉर्कमध्ये एका शूटदरम्यान प्रियंकाने 'डायनाला' दत्तक घेतले होते.

अनुष्का शर्माकडे 'डूड' नावाचा लॅब्रोडोर आहे. अनुष्का आपल्या कुत्र्यासोबत अनेक व्हिडियो आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

जॅकलिनकडे सुद्धा पर्शियन मांजर आहे जिचे नाव 'मिमीयू' आहे तर एक सियामी मांजर आहे जिचे नाव 'योडा' आहे इतकेच नव्हे तर तिच्याकडे 'लोकी' आणि 'झायझा' नावाचे आणखी दोन मांजरी आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!