पहिल्यांदा जिच्यासोबत अर्जुन रामपालने रॅम्प वॉक केला होता; तिच्यासोबतच केलं होतं लग्न, पण.....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 01:34 PM2020-11-26T13:34:18+5:302020-11-26T13:45:23+5:30

अर्जुनने नाशिक येथील देवळाली येथे आपलं शिक्षण पूर्ण केलं. आश्चर्याची बाब म्हणजे त्याला कधीही मॉडल किंवा अभिनेता व्हायचं नव्हतं.

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आज म्हणजे २६ नोव्हेंबरला आपला ४६ वां वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म आजच्या दिवशीच १९७२मध्ये जबलपूरमध्ये झाला होता. अर्जुनने नाशिक येथील देवळाली येथे आपलं शिक्षण पूर्ण केलं. आश्चर्याची बाब म्हणजे त्याला कधीही मॉडल किंवा अभिनेता व्हायचं नव्हतं. पण एक दिवस रॅंम्प वॉक करताना घाबरणारा तरूण पुढे जाऊन भारताचा सुपरमॉडल बनला.

अर्जुन रामपाल अभिनयाआधी मॉडलिंगमध्ये काम केलं. त्यानला १९९४ मध्ये सोसायटी फेस ऑफ द इअर निवडण्यात आलं होतं. एका मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की, जेव्हा त्याने पहिल्यांदा रॅम्प वॉक केला होता तेव्हा त्याने सोबत वॉक करत असलेली मॉडल मेहरचा हात पकडला होता.

अर्जुनने पहिल्यांदा रॅम्प वॉकदरम्यान ज्या मॉडलचा हात पकडला होता तिचाच हात आयुष्यभरातील हाती घेतला होता. मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की, हॉस्टेलच्या दिवसात त्याच्या रूममध्ये मेहरचं एक पोस्टर लावलं होतं. त्याला वाटत होतं की, बायको असावी तर अशी असावी.

नंतर अर्जुनने १९९८ मध्ये फेमिना मिस इंडिया मेहर जेसियासोबत लग्न केलं होतं. त्यांना दोन मायरा आणि महिका मुली आहेत. पण आता अर्जुन आणि मेहर यांचा घटस्फोट झाला आहे.

अर्जुन आणि मेहर लग्नाच्या २१ वर्षांनंतर वेगळे झाले. दोघांनीही आपलं नातं वाचवण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही. दोघांनी आपलं नातं संपवण्याचा निर्णय घेतला. दोघांना वेगळे होण्याची ऑफिशिअल घोषणा केली होती.

अर्जुन आणि मेहरचा एप्रिल २०१९ मध्ये घटस्फोट झाला होता. त्याच्या दोन्ही मुली आई मेहरकडे राहतात. तर अर्जुन त्याची गर्लफ्रेन्ड ग्रॅबिएलाकडे राहतो. दोघांना एक मुलगाही आहे. पण त्यांनी अजून लग्न केलेलं नाही.

अर्जुन रामपालच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर अर्जुन अखेरचा 'डॅडी' सिनेमात दिसला होता. त्याने डिजिटल डेब्यूही केलं आहे. तो 'द फायनल कॉल'मध्ये दिसला होता.

काही दिवसांपूर्वी अर्जुन एनसीबीच्या चौकशीमुळे चर्चेत होता. एनसीबीने त्याच्या घरी छापा मारला होता. तेव्हा काही इलेक्ट्रॉनिक डिवाइस जप्त केले होते आणि काही अवैध औषधेही मिळाली होती. त्यासाठी त्याची चौकशी करण्यात आली होती.