अर्चना पूरण सिंगचा मुलगा देतोय दिग्गज अभिनेत्यांना टक्कर; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 05:22 PM2021-09-14T17:22:01+5:302021-09-14T17:27:26+5:30

Ayushmaan sethi : आयुष्मान लाइमलाइटपासून शक्यतो दूर राहत असतो. मात्र, सोशल मीडियावर तो चांगलाच सक्रीय आहे.

कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे अर्चना पूरण सिंग आणि परमीत सेठी. हे दोन्ही कलाकार कलाविश्वात आणि सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. मात्र, त्यांची मुलं कायमच लाइमलाइटपासून दूर असतात.

अर्चना पूरण सिंगला आर्यमन आणि आयुष्यमान ही दोन मुलं आहेत. विशेष म्हणजे अर्चनाचा धाकटा मुलगा आयुष्मान त्याच्या पर्सनालिटी आणि गुड लुकिंगमुळे आतापासूनच चर्चेत येऊ लागला आहे

आयुष्मान लाइमलाइटपासून शक्यतो दूर राहत असतो. मात्र, सोशल मीडियावर तो चांगलाच सक्रीय आहे.

आयुष्मान २२ वर्षांचा असून इन्स्टाग्रामवर त्याचे 27.3k फॉलोअर्स आहेत.

आयुष्यमानला गायनाची आवड असून अनेकदा तो सोशल मीडियावर त्याच्या गायनाचे व्हिडीओ शेअर करत असतो.

अर्चनाचा हा धाकटा मुलगा फिटनेस फ्रिक असून सोशल मीडियावर तो वर्क आऊट करतानाचे फोटोही शेअर करत असतो.

आयुष्मान त्याच्या पर्सनालिटीमुळे लोकप्रिय होत असून अनेक तरुणींच्या गळ्यातलं ताईत झाला आहे. त्यामुळे आतापासूनच तो कलाविश्वातील अभिनेत्यांना टक्कर देतोय असं दिसून येतं.

आयुष्मान युकेमध्ये स्थिरावला असून अनेकदा अर्चना त्याला भेटण्यासाठी युकेला जात असते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!