अनन्या पांडेची साऊथ सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री, झळकणार विजय देवरकोंडासोबत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 06:09 PM2020-02-20T18:09:35+5:302020-02-20T18:12:02+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आता दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे.

अनन्या पांडेच्या साऊथच्या चित्रपटाचे नाव फायटर असून यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हा चित्रपट हिंदी व तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. याशिवायदेखील आणखीन काही भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती करण जोहर, चार्मी कौर, अपूर्व मेहता करत आहेत.

अनन्या पांडे व विजय देवरकोंडा यांनी देखील ट्विट करत एकमेकांना वेलकम केले आहे.

अनन्या पहिल्यांदाच विजय देवरकोंडा सोबत काम करताना दिसणार आहे.

त्या दोघांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे.