IN PICS: 2021 मध्ये अमिताभ बच्चन, सलमान खान, अक्षय कुमार आणि आलिया भटचे रिलीज होणार 'हे' सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 05:53 PM2021-01-08T17:53:25+5:302021-01-08T17:53:59+5:30

दरवर्षी अक्षय कुमारचे तीन ते चार सिनेमा रिलीज होतात. परंतु यावर्षीच्या चित्रपटांच्या रिलीजचे समीकरण बघितले तर असे दिसते की अनेक मोठ्या कलाकारांचे यावर्षी 3 ते 4 सिनेमा रिलीज होऊ शकतात. (Photo Instagram)

गेल्या वर्षी सिनेमांचे शूटिंग नाही होऊ शकले ते एकतर अनलॉकनंतर तयार झाले आहेत किंवा काही दिवसांत पूर्ण होणार आहेत. असे बरेच मोठे कलाकारा आहेत ज्यांचे तीन ते चार चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत.(Photo Instagra

आलिया भटचे 3 चित्रपट 2021 मध्ये रिलीज होऊ शकतात. यातले पहिल्या सिनेमाचे नाव आहे ‘ब्रह्मास्त्न’. (Photo Instagram)

एसएस राजामौलीच्या दिग्दर्शित 'आरआरआर' रिलीज होईल. आलिया सध्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाची शूटिंग करते आहे. (Photo Instagram)

बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी अक्षय कुमार हे एक नाव आहे. २०२० मध्ये अक्षयचा एकमेव चित्रपट 'लक्ष्मी' रिलीज झाला. त्याचा मोस्ट अवेटेड सिनेमा 'सूर्यवंशी' रिलीजच्या प्रतीक्षेत आहे. (Photo Instagram)

अलीकडेच अक्षयने सारा अली खान आणि धनुषसोबत 'अतरंगी रे' चे शूटिंगही पूर्ण केले आहे. सध्या तो जैसलमेरमध्ये 'बच्चन पांडे' सिनेमाचे शूटिंग करतो आहे. याशिवाय त्याचा ‘पृथ्वीराज’ हा चित्रपटही येणार आहे. (Photo Instagram)

मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा 2020 मध्ये ‘गुलाबो सिताबो’ रिलीज झाला होता. यावर्षी रणबीर-आलियासमवेत त्यांचा ‘ब्रह्मास्त्न, रुमी जाफरीचा सिनेमा ‘चेहरे’ आणि नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ सिनेमा रिलीज होण्याची शक्यता आहे. (Photo Instagram)

सलमान खानचा 'राधे' हा सिनेमा यंदा रिलीज होणार आहे. दिशा पटानी, जॅकी श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'राधे'चे शूटिंग पूर्ण झाले आहे. सध्या सलमान अंतिम सिनेमाचे शूटिंग करतोय. (Photo Instagram)

बऱ्याच दिवसांपासून रणबीर कपूरचा कोणताही सिनेमा रिलीज झालेला नाही. यावर्षी त्याचा ‘ब्रह्मास्त्न' सिनेमा रिलीज होण्याची अपेक्षा आहे. (Photo Instagram)

अजय देवगणचे तीन-चार सिनेमा यावर्षी रिलीज होऊ शकतात. 'मैदान' आणि 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ हे त्यापैकी आहेत. (Photo Instagram)

एसएस राजामौलीच्या 'आरआरआर'मध्येही तो एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तसेच तो यावर्षी दिग्दर्शनातही हात आजमावणार आहे. अमिताभ बच्चन आणि रकुलप्रीत सिंग यांच्यासोबत तो 'मेडे' सिनेमा तयार करतो आहे. (Photo Instagram)